माजी विद्यार्थी व्हॉटस् अॅप ग्रुपचे गेट टुगेदर संपन्न

⚡वेंगुर्ला ता.०९-: – येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. या व्हॉटस् अॅप ग्रुपचे गेट टु गेदर ८ नोव्हेंबर रोजी महाविद्यालयात संपन्न झाले. सुरुवातीला बॅ.खर्डेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

  या कार्यक्रमाला प्राचार्य विलास देऊलकर, संमेलनाचे अध्यक्ष श्रीनिवास नाईक, प्रा. आनंद बांदेकर, सी.ए.सुनिल सौदागर, निता गोवेकर व आयोजक विजयसिह मोंडकर यांच्यासह दरवर्षी या गेट टुगेदरला येणारे आणि यंदा प्रथमच सहभागी झालेले असे मिळणून एकूण ४० माजी विद्यार्थी उपस्थित होते. सायंकाळी झालेल्या गाण्यांच्या कार्यक्रमात सुनिल नांदोसकर, काका परब, अरुण खानोलकर यांनी कार्यक्रमात रंगत आणली. पुढच्यावर्षी २७ नोव्हेंबर २०२३ ला गे टुगेदर करण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले.
You cannot copy content of this page