Headlines

राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे 17 व 18 डिसेंबरला आयोजन

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने 17 व 18 डिसेंबर रोजी चिवला बिच, मालवण येथे राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 0000

Read More

कसाल हायस्कुलमध्ये सोमवारी घुंगुरकाठी बाल-कुमार साहित्य संमेलन

अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र चव्हाण, उद्घाटक अभय खडपकर ⚡सिंधुदुर्गनगरी, दि. ९-: ”घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेच्यावतीने सोमवार दि. १२ रोजी कसाल हायस्कूलच्या सभागृहामध्ये ‘घुंगुरकाठी बालकुमार साहित्य संमेलना’चे आयोजन लेखक आणि कल्पक दिग्दर्शक डॉ. राजेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. सई लळीत यांनी दिली. संमेलनाचे उद्घाटन अभिनेते अभय खडपकर यांच्याहस्ते होणार आहे. यासंदर्भात माहिती देताना…

Read More

तोपर्यंत बॉक्सेल ब्रिज कोसळण्याचे काम करू देणार नाही

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा महामार्गच्या अधिकाऱ्यांना इशारा कणकवली ता.०९-:कणकवलीतील फ्लाय ओव्हर ब्रिजला जोडणाऱ्या बॉक्सेल ब्रिज च्या सर्विस रस्त्याच्या लगतच्या भिंती हटवण्याचे काम उद्यापासून सुरू करण्यात येणार असल्याने याबाबत नगरपंचायत कडे सहकार्य मागण्या करता गेलेल्या महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी खडे बोल सुनावले. कणकवली शहरवासीयांची अनेक कामे प्रलंबित असताना केवळ ठेकेदाराच्या सोयी करता…

Read More

बकरी आडवी आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार महिला जखमी

सावंतवाडी ता.०९-: येथील तहसीलदार कार्यालयासमोर बकरी अचानक रस्त्याच्या आडवी आल्याने महिला दुचाकीस्वार जखमी झाली आहे. हा अपघात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला. स्थानिक नागरिकांनी तिला उपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलवले.

Read More

वेत्ये येथील महामार्गावर विचित्र अपघात

टायर फुटल्याने दोन चार चाकिंची धडक;दोघे जखमी ⚡सावंतवाडी ता.०९-: मुंबई- गोवा महामार्गावर वेत्ये येथे चार चाकी गाडीचा टायर फुटल्याने ती विरुद्ध डिव्हायडरच्या दिशेने जाऊन समोरून येणाऱ्या चार चाकी गाडीला आपटल्याने जोरदार धडक बसली. यात दोघेजण जखमी झाले. हा अपघात दुपारी सव्वा एकच्या दरम्यान वेत्ये येथे घडला. दरम्यान दोन्ही जखमींना स्थानिक नागरिकांनी तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या…

Read More

वेंगुर्ला मिडटाऊनचे सेवाभावी कार्य कौतुकास्पद-गौरिश धोंड

⚡वेंगुर्ला ता.०९-: गरजूं रुग्णांना घरगुती उपचारांकरीता आवश्यक असलेल्या ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर, व्हिलचेअर यांसारख्या वैद्यकीय सेवासाधनची मोफत उपलब्धता व्हावी या उद्देशाने रोटरी वेंगुर्ला मिडटाऊन सुरू करीत असलेल्या रोटरी सेवा केंद्र हे सेवाभावी कार्य कौतुकास्पद असून, वेंगुर्ल्यातील सर्वसामान्यांना लाभ होईल अशा विविध वैद्यकीय रोटरी प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून, शहर व ग्रामीण भागातील गरजू जनतेसाठी सेवाभावी कार्य वाढवा, यासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट…

Read More

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग क्रीडा स्पर्धा 11 ते 13 डिसेंबरला

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: जिल्हा क्रीडा परिषद, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि मामाचो गाव रिसॉर्ट, हिर्लोक, यांचे सहकार्याने सन 2022-23 या वर्षात राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग (17 व 19 वर्षाखालील मुली) क्रीडा स्पर्धा दिनांक 11 ते 13 डिसेंबर 2022 या कालावधीत मामाचो गाव रिसॉर्ट, हिर्लोक,कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी जिल्हयातील सर्व शाळा, महाविद्यालये, खेळाडू, क्रीडा…

Read More

तोरसे अपघातात ट्रक चालक गंभीर

गोव्याहून हरियाणाच्या दिशेने सुरू होती बेकायदा दारु वाहतूक : रस्त्यावर विखुरल्या दारूच्या बाटल्या ⚡बांदा ता.०९-: गोव्याहून हरियाणाच्या दिशेने गोवा बनवटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या ट्रकला महामार्गावर तोरसे (गोवा) येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. अपघातनंतर संपूर्ण रस्त्यावर दारूच्या बाटल्या विखुरल्या होत्या.

Read More

उत्तर प्रदेशातील आरोपीला पकडण्यात वेंगुर्ले पोलिसांना यश

आरवली सोन्सुरे येथील खुनी हल्ल्या प्रकरण : दोन महिन्यात छडा ⚡वेंगुर्ले ता.०९-: आरवली सोन्सुरे मधलीवाडी येथील विनायक आत्माराम राणे यांच्या काजूच्या बागेच्या देखभालीकरीता असलेला बिहार येथील रामतपेशा राजभर वय-38 याच्यावर सुरीने खुनी हल्ला करून पळून गेलेल्या दोन संशयित आरोपींपैकी एकाला उत्तर प्रदेश येथून पकडुन अटक करण्यात वेंगुर्ले पोलीस पथकाला यश आले आहे.दोन महिन्यांपूर्वी हा गुन्हा…

Read More

मळगाव येथील अपघातातील गंभीर जखमी युवकाचे उपचारादरम्यान निधन

⚡सावंतवाडी ता.०९-: दुचाकीने मळगाव येथील जत्रोत्सवाला जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या धोंडीराज उर्फ ओमकार बाळा राऊळ (२३, रा. मळगाव देऊळवाडी ) या युवकाचे गोवा बांबूळी येथे उपचारादरम्यान गुरुवारी रात्री दुर्दैवी निधन झाले.एकुलत्या मुलाच्या अशा जाण्याने राऊळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ओमकार राऊळ, लवू रामकृष्ण राऊळ व अक्षय अशोक भगत…

Read More
You cannot copy content of this page