गोव्याहून हरियाणाच्या दिशेने सुरू होती बेकायदा दारु वाहतूक : रस्त्यावर विखुरल्या दारूच्या बाटल्या
⚡बांदा ता.०९-: गोव्याहून हरियाणाच्या दिशेने गोवा बनवटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या ट्रकला महामार्गावर तोरसे (गोवा) येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. अपघातनंतर संपूर्ण रस्त्यावर दारूच्या बाटल्या विखुरल्या होत्या.
