मळगाव येथील अपघातातील गंभीर जखमी युवकाचे उपचारादरम्यान निधन

⚡सावंतवाडी ता.०९-: दुचाकीने मळगाव येथील जत्रोत्सवाला जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या धोंडीराज उर्फ ओमकार बाळा राऊळ (२३, रा. मळगाव देऊळवाडी ) या युवकाचे गोवा बांबूळी येथे उपचारादरम्यान गुरुवारी रात्री दुर्दैवी निधन झाले.
एकुलत्या मुलाच्या अशा जाण्याने राऊळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ओमकार राऊळ, लवू रामकृष्ण राऊळ व अक्षय अशोक भगत ( सर्व राहणार मळगाव) हे आपल्या दुचाकीने मळगांव येथील जत्रोत्सवाला जात असताना समोरून वेगात येणाऱ्या बोलेरो टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात ते तिघेही जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना उपचारार्थ सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर गंभीर जखमी असल्याने यातील ओमकार याला गोवा बांबोळी येथे अधिक उपचारार्थ हलविण्यात आले होते. त्यानंतर गेले काही दिवस तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. वर्षभरापूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते.

You cannot copy content of this page