Headlines

संतोष वायंगणकर लिखित “सेलिब्रिटींचा कोरोना काळ” पुस्तकाचे ९ सप्टेंबर रोजी कणकवलीत प्रकाशन

प्रा.जी. ए.सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती:कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे कार्यक्रमाचे आयोजन ⚡कणकवली ता.०५-: ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर लिखित आणि कवी अजय कांडर संचलित प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या “सेलिब्रिटींचा कोरोना काळ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा. कणकवली पंचायत समितीच्या प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने…

Read More

साकेडी तंटामुक्त समिती
अध्यक्षपदी राजु सदडेकर

⚡कणकवली ता.०५-:साकेडी गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी कृष्णा विठ्ठल उर्फ राजू सदडेकर यांची एक मताने निवड करण्यात आली. साकेडी ग्रामपंचायतची ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. या प्रसंगी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सदडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. सदडेकर हे साकेडी सोसायटीच्या संचालक पदी कार्यरत असून त्यांच्या या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल…

Read More

गणेशोत्सवापूर्वी कलमठ गावातील वीज समस्या सोडवा

युवा सेनेच्यावतीने विद्युत वितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी ⚡कणकवली ता.०५-: कलमठ गावातील वीज समस्या बाबत वारंवार अर्ज करून देखील वीज समस्या सोडवली जात नाही. यामुळे कलमठ गावात वारंवार वीज खंडित होवून नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वीज समस्या मार्गी लागावी यासाठी ठाकरे युवा सेनेच्या वतीने विद्युत वितरणच्या कार्यालयाला धडक दिली. कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते…

Read More

खारेपाटण मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला धक्का…

ठाकरे गटाच्या ग्रामपंचायत उमेदवार आणि जिल्हा परिषद शाळा रामेश्वर च्या मा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदिनी पराडकर यांचा शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश… कणकवली ता.०५-: शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नंदिनी पराडकर यांनी शिंदे गट शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. युवा सेना जिल्हाप्रमुख सुकांत वरुणकर ,उपतालुक प्रमुख मंगेश गुरव आणि…

Read More

शेतकऱ्यांकडील उत्पादीत मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी खरेदी विक्री संघाचे प्रयत्न…

प्रमोद गावडे:मयत सभासद वारसांनी नोंद करून सहकार्य करावे.. सावंतवाडी,दि.५ सप्टेंबर (प्रतिनिधी)शासकीय भात खरेदी,खत विक्री व्यवसाया सोबत शेतकऱ्यांकडील उत्पादीत मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच शेतकरी व बागायतदारांच्या हिताच्या दृष्टीने काही उपक्रम हाती घेण्याबाबत संचालक मंडळ विचाराधीन आहे, असे प्रतिपादन चेअरमन प्रमोद गावडे यांनी केले. सावंतवाडी तालुका…

Read More

सुजाण मतदार हे भारतीय लोकशाहीचे मर्मस्थान आहे..

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे ; भोसले नॉलेज सिटी मध्ये लोकशाही जीवन प्रणाली आणि शिक्षण या विषयावर चर्चासत्र संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.०५-: भारताच्या लोकशाही समोर अनेक आव्हाने निर्माण झाली होती परंतु भारतीय लोकशाही अधिक प्रौढ झाली. स्वातंत्र्यानंतर भारतीय लोकशाही तोडण्याचे काम अनेक वेळा झाले . परंतु भारतीय लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम येथील सुजाण मतदारांनी केले. सुजाण…

Read More

सावंतवाडीत प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलन…

शिक्षक समितीने राबविले सामूहिक रजा आंदोलन सावंतवाडीराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज येथे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती सावंतवाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर सामूहिक किरकोळ रजा आंदोलन सोडले यावेळी आमच्या मागण्या सोडवण्यासाठी कोणतीही हालचाल न केल्यास हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती विराट मोर्चा काढेल असा इशारा समितीच्या…

Read More

चौकुळ येथील राजू गावडे यांचे गोवा येथे निधन

सावंतवाडी :- चौकुळ येथील मूळ रहिवासी व सध्या राहत असलेले गोवा – पेडणे येथील राजू उर्फ राजेश दिगंबर गावडे यांचे आज सकाळी गोवा येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. राजू गावडे यांनी सैनिक नागरी पतसंस्थेत काही दिवस वसुली अधिकारी म्हणून काम केले होते. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यावेळी…

Read More

शिक्षकांना सक्षम नागरिकच घडविण्याचे कार्य द्या…

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची मागणी सिंधुदुर्गनगरी ता ५शिक्षकांना केवळ उद्याचा सक्षम नागरिक घडविण्याचे कार्य करू द्या ,त्यासाठी शिक्षकांना दिलेले साक्षरता सर्वेक्षणाचे काम तात्काळ थांबविण्यात यावे. स्वयंसेवी संस्थेकडून पूर्ण करून घेण्यात यावे. अशी मागणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने शासनाकडे केली आहे याबाबतचे निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे सादर केले सध्या महाराष्ट्र…

Read More

शिक्षक भरतीत स्थानिक डी एड बेरोजगारांना संधी द्या…

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनची वार्षिक मेळाव्यात मागणी.. सिंधुदुर्गनगरी ता ५जिल्ह्यातील डीएड बेरोजगार तरुणांच्या वाढत्या वयाचा विचार करून आणि पोर्टलचा विचार न करता शिक्षक भरतीत स्थानिक तरुणांना प्राधान्य द्यावे. असा ठराव सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्या वार्षिक मेळाव्यात करण्यात आला. सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग चा वार्षिक मेळावा कणकवली “वृंदावन” सभागृह येथे संपन्न झाला. या मेळाव्यात…

Read More
You cannot copy content of this page