मालवणात २१ रोजी गुरुपौर्णिमा कार्यक्रम…

⚡मालवण ता.१६-:सनातन संस्थेतर्फे दि. २१ जुलै रोजी सायंकाळी ४ ते ६ यावेळेत मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्री व्यासपूजा आणि प. पू भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन, साधकांचे अनुभवकथन आणि हितचिंतकांचा सत्कार, राष्ट्र आणि धर्म या संदर्भातील कार्याविषयी मान्यवरांचे विचार, तसेच ‘आनंदप्राप्ती आणि रामराज्याची स्थापना यासाठी साधना’ याविषयी व्याख्यान,…

Read More

बस गाड्यांची घोषणा करण्यासाठी ध्वनीक्षेपकाची सुविधा आजपासून सुरु…

प्रवाशी व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली दूर:सातत्याने पाठपुरावा केल्याने आमच्या मागणीला यश;रियाज खान.. ⚡बांदा ता.१६-: बांदा बसस्थानकात बस गाड्यांची घोषणा करण्यासाठी ध्वनीक्षेपकाची सुविधा आजपासून सुरु करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशी तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी महिन्याभरापूर्वी निवेदन देऊन मागणी केली होती. सातत्याने पाठपुरावा करून…

Read More

हक्काच्या नोकरीसाठी स्थानिक युवकांना संघर्ष करावा लागतोय हे दुर्दैव…

अर्चना घारे:डी. एड. बेरोजगारांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार डीएड युवक व युवतींना जिल्ह्यातच नोकरीसाठी संघर्ष करावा लागतोय, हे शिक्षण मंत्र्यांचे अपयश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या वतीने डीएड बेरोजगारांच्या संघर्ष समितीच्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. तसेच येथील युवकांच्या न्याय मागण्यासाठी संविधानिक मार्गाने सुरू असलेल्या…

Read More

इळये वरंडवाडी येथील युवक बेपत्ता…

⚡देवगड ता.१६-:इळये वरंडवाडी येथिल किरण मंगेश सावंत(२८) हा युवक बेपत्ता झाला आहे.याबाबतची तक्रार त्याचा आईने देवगड पोलिस स्थानकात दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, इळये वरंडवाडी येथील किरण मंगेश सावंत हा युवक दि. १४ जुलै रोजी सकाळी ८ वा.सुमारास घरात कोणालाही काहीही न सांगता निघुन गेला. नातेवाईक, आजुबाजुच्या गावात व परिसरात त्याचा शोध घेवूनही तो…

Read More

देवगडात तालुक्यात अतिवृष्टीमुळे सुमारे दोन लाखाचे नुकसान ; १६७ मिमी पाऊस…

⚡देवगड ता.१६-: देवगड तालुक्यात पावसाची संंतप्तधार ही सुरूच असून मंगळवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पडझड होऊन तालुक्यात सुमारे २ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.देवगड तालुक्यात १६७ मीमी इतक्या पावसाची नोंद असून आतापर्यंत तालुक्यात १८६२ मिमी इतकी नोंद आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील आडबंदर येथील विलास जनार्दन सनये यांच्या घरानजिक असलेली संरक्षक भिंत घरावर कोसळल्याने घराच्या भिंतींना…

Read More

देवगड तालुक्यातील विठ्ठल मंदिरात उद्या आषाढी एकादशी उत्सव…

⚡देवगड ता.१६-:आषाढी एकादशी उत्सवानिमित्त देवगड तालुक्यातील ठिकठिकाणीच्या विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटे ४ वाजता पाद्यपूजा,५ ते ६:३० काकड आरती,भाविकांना दर्शनास प्रारंभ,सकाळी ९ घटस्थापना व हरिनामाचा गजर,सायंकाळी ४ ते ५:३०तारामुंबरी महिला भजन दिंडी, सायंकाळी ५:३० ते ६ नृत्यप्रियाइंन्स्टीट्युशन परफेक्ट बीट डान्स ग्रुप जामसंडे, सायंकाळी…

Read More

शिरगाव महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या ५७ वा आंतरमहाविद्यालयीन विभागीय युवा महोत्सव संपन्न…

देवगड (प्रतिनिधी)१६ जुलै २०२४ युवा महोत्सव हे विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्याचे प्रमुख केंद्र आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. निलेश सावे यांनी युवा महोत्सवा दरम्यान केले.पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालय शिरगाव येथे आयोजित मुंबई विद्यापीठाच्या ५७ आंतरमहाविद्यालयीन विभागीय युवा महोत्सव कार्यक्रमादरम्यान ते बोलत होतेयावेळी प्रमुख अतिथी मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. निलेश…

Read More

कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेलेच; मंगळवारी चार गाड्या रद्द…

⚡कणकवली ता.१६-: कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी येथे कोसळलेली दरड हटवून कोकण रेल्वेची वाहतूक सुरु झाली असली तरी कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेलेच आहे. कोकण रेल्वेने मंगळवारीही चार गाड्या रद्द कराव्या लागल्या. चार गाड्यांचे वेळापत्रक बदलावे लागले तर तीन गाड्या प्रचंड उशीराने धावत होत्या. रविवारी सायंकाळी दिवाणखवटी येथे दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे तब्बल २६ तास ठप्प होती….

Read More

शिक्षक पद भरतीत स्थानिक डी एड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना सामावून घ्या…

डी एड बेरोजगार संघर्ष समितीच बेमुदत धरणे आंदोलनात मागणी:तरयेत्या दोन दिवसात कोर्टाकडे प्रस्ताव सादर करतो.; मंत्री केसरकरांच आश्वासन.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता १६-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्त असलेल्या शिक्षक पद भरतीत स्थानिक डी एड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना सरसकट शिक्षण सेवक म्हणून सामावून घ्यावे. या मागणीसाठी डी एड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने आज पासून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे…

Read More

जिल्हा नियोजन सदस्यांनी मांडलेले विषय मार्गी लावावे…

रवींद्र चव्हाण:ग्राम पंचायतीनी शासनाच्या योजनांचा फलक कार्यालयाबाहेर लावा… ⚡ओरोस ता.१६-: जिल्हा नियोजन सभेत सदस्यांनी अनेक विषयांना वाचा फोडली आहे. अधिकाऱ्यांनी यांचे गांभीर्य ओळखून मांडलेले विषय मार्गी लावले पाहिजेत. त्याचा कार्यपूर्ती अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हा नियोजन समिती सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले. जिल्हा नियोजन सभेच्या शेवटी पालकमंत्री…

Read More
You cannot copy content of this page