Headlines

Global Maharashtra Breaking News

श्री देव काजरेश्वराचे १० व्या वार्षिकोत्सव सोहळ्यानिमित्त रुपेश राऊळ यांनी घेतले दर्शन…!

⚡वेंगुर्ला,ता.०४-: वायंगणी येथील श्री देव काजरेश्वराचे १० व्या वार्षिकोत्सव सोहळ्यानिमित्त ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी दर्शन घेतले. यावेळी तालुकाप्रमुख बाळू परब,युवसेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, उपतालुका प्रमुख उमेश नाईक, आनंद दाभोलकर,सुमन कामत,उल्हास कामत आदी उपस्थित होते.वेंगुर्ले वायंगणी येथे रथसप्तमी तिथेच औचित्य साधून श्री देव काज्रेश्वराच्या वार्षिक उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

Read More

कै.गुरूदास तिरोडकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी महारक्तदान शिबिर…

⚡वेंगुर्ला ता.०४-: वेताळ प्रतिष्ठानचे विश्वासार्ह आणि समर्पित कार्यकर्ते कै.गुरूदास तिरोडकर यांच्या अथक सेवेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला अनोख्या पद्धतीने सन्मान देण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान आणि सहयोगी संस्थांच्या तसेच कै.गुरूदास तिरोडकर मित्रपरिवारातर्फे १५ फेब्रुवारी रोजी उत्सव मंगल कार्यालय, तुळस येथे सकाळी ९ वा. महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

Read More

बीच वर्कआऊट इव्हेंटला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला नगरपरिषद, युवक शरीरसौष्ठव संवर्धन संस्था, सातेरी व्यायामशाळा व सोन्सुरकर फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला व सुदृढ वेंगुर्ला‘ या संकल्पनेच्या अनुषंगाने २ फेब्रुवारी रोजी जलबांदेश्वर येथे विशेष ‘बीच वर्कआऊट इव्हेंट‘ घेण्यात आला. याला सर्वस्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Read More

विभागीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कु. हेमांगी मेस्त्री प्रथम…

राज्यस्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड.. ⚡सावंतवाडी ता.०४-: कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चराठा येथील कु. हेमांगी गजानन मेस्त्री या विद्यार्थिनीने ८४ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत कु. हेमांगी मेस्त्री हिने २६५ किलो वजन उचलत प्रथम क्रमांक पटकावला.कु. हेमांगी मेस्त्री हिची आता राज्यस्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली…

Read More

स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समाधीस्थळी भेट देत केले अभिवादन…

⚡सावंतवाडी ता.०४-: स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या 101 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या माजगाव येथील प्रेरणा या समाधीस्थळी त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला कुडाळचे माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देत अभिवादन केले यावेळी विक्रांत सावंत माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत विक्रांत सावंत रुपेश राऊळ चंद्रकांत कासार आदी मान्यवर

Read More

वैभववाडी रिक्षा संघटनेचा उद्या 19 व्या वर्धापन दिन …

⚡वैभववाडी ता.०४-: रिक्षा संघटना वैभववाडी यांच्या वतीने बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी 19 व्या वर्धापन दिना निमित्त सकाळी सत्यनारायणाची महापूजा न्यू यंग स्टार ढोल पथक वाभवे वैभववाडी महाप्रसाद सायंकाळी श्री पावनाई देवी समय नृत्य किंजवडे परबवाडी हळदी कुंकू रात्री 20-20 डबलबारीचा जंगी सामना बुवा कुमारी रिया मिस्त्री विरुद्ध प्रणाली अनुभवणे यांच्यात होणार आहे तरी…

Read More

विलवडे टेंबवाडी शाळा नं. २ च्या स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०४-: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्या पाया प्राथमिक शाळेतच रचला जातो. त्यामुळे जीवनातील यश हे प्राथमिक शिक्षणावरच अवलंबून असते. विलवडे शाळा नं. २ पटसंख्येने लहान आहे. मात्र शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांच्या एकजुटीतून या शाळेतील विविध कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम कौतुकास्पद आहेत. असे प्रतिपादन विलवडे गावचे सुपुत्र तथा मुंबईस्थित निवृत्त कार्यकारी अभियंता मुंबईचे…

Read More

बांदा येथील ‘हाय व्हॅली जंगल रिसॉर्ट’ मध्ये १९८२-८३ च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा संपन्न…!

⚡बांदा ता.०४-: डेगवे येथील माध्यमिक विद्यालयाच्या वर्ष १९८२-८३ या वर्षातील इयत्ता दहावीच्या बॅचचे विद्यार्थी तब्बल ४३ वर्षानंतर स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेत. बांदा येथील ‘हाय व्हॅली जंगल रिसॉर्ट’ मध्ये संपन्न झालेल्या एकदिवशीय स्नेहमेळाव्यात सवंगड्यानी अनेक आठवणी जागविल्या. यावेळी ४२ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.मेळाव्याचा प्रारंभ श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. संतोष…

Read More

खुल्या निबंध स्पर्धेत मंदार चोरगे तर शालेय गटात अश्मी भोसले प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.०४-: वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने सलग अकराव्या वर्षी लिहित्या हाताना व्यासपीठ मिळावे म्हणून खुल्या आणि शालेय गटात निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दोन्ही स्पर्धेत अगदी संपूर्ण महाराष्ट्र मधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खुल्या निबंध स्पर्धेत मंदार चोरगे तर शालेय गटात अश्मी भोसले यांनी क्रमांक पटकाविला. फोटो-मंदार चोरगे, किशोर वालावलकर, डॉ.राजेश जोशी, निता सावंत,…

Read More

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीला उपस्थित न राहिल्याने वैभव नाईक यांना पुन्हा नोटीस…

⚡कणकवली ता.०४-: माजी आमदार वैभव नाईक व त्यांच्या पत्नी स्नेहा वैभव नाईक यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू असताना पुन्हा त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रत्नागिरी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी कार्यालयात उपस्थित राहावे अशी नोटीस बजावण्यात आल्याने शिवसेना ठाकरे गटात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. याआधी…

Read More
You cannot copy content of this page