⚡बांदा ता.२३-: बंदुकीच्या गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झालेल्या घोरपडीला आज बांदा येथे जीवदान देण्यात आले. वनविभागाच्या जलद कृती दलाच्या पथकाने स्थानिकांसह यासाठी मदतकार्य केले. जखमी व अशक्त झालेल्या घोरपडीला सावंतवाडी येथे वन विभागाच्या कार्यालयात अधिक उपचारासाठी नेण्यात आले.
मुंबई गोवा महामार्गावर बांदा सटमटवाडी येथे प्रदीप भाईप यांच्या हॉटेल सावली नजीक ही भली मोठी घोरपड जखमी अवस्थेत होती. ती अशक्त झाल्याने तिला चालताही येत नव्हते. श्री भाईप यांनी या घोरपडीला कुत्रे तसेच इतर वन्य प्राण्यांपासून सुरक्षित ठेवले. त्यांनी याची कल्पना पत्रकार नीलेश मोरजकर यांना दिली. श्री मोरजकर यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर यांच्या माध्यमातून वनविभागाच्या जलद कृती दलाशी संपर्क साधला. त्यांनी तात्काळ बांदा येथे येत जखमी घोरपडीवर प्राथमिक उपचार केलेत. यावेळी वनविभागाच्या जलद कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर, राकेश अमरूसकर, शुभम कळसुलकर, प्रथमेश गावडे, आनंद राणे, सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर, प्रदीप भाईप आदी उपस्थित होते.
बंदुकीच्या गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झालेल्या घोरपडीला जीवदान…!
