मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर:स्वच्छ्ता व प्लास्टिक मुक्तीसाठी प्रयत्न करावे..
ओरोस ता २३
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ या उपक्रमांतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात निर्माण झालेल्या सुविधांचा वापर तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेले परिसर स्वच्छता शिवाय प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन बदललेल्या मानसिकतेची माहिती घेण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने पाहणी करण्यात येणार असल्याने सर्व ग्रामस्थांनी मिळून लोकसहभाग व श्रमदानातून या सार्वजनिक सुविधांचा पुरेपूर वापर करत परिसराची स्वच्छता, व प्लास्टिक मुक्तीची अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविद्र खेबुडकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या उपक्रमामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत सहभागी होत असते. केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतीची अद्यावत माहिती घेऊन उभारण्यात आलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांची चाचणी व तपासणी करण्यासाठी केंद्रशासनाचे पथक जिल्ह्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीची तपासणी करून एक हजार गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणांकनाच्या आधारे जिल्ह्याचे गुणांकन ठरणार आहे. त्याचप्रमाणे राज्याचे देखील गुणांकन देशपातळीवरती ठरणार असल्याने प्रत्येक गावाने आपापल्या सुविधांचा वापर नियमित केला पाहिजे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी केले आहे.
या पाहणी दरम्यान प्लास्टिक संकलन व व्यवस्थापन म्हणजेच वर्गीकरण केंद्राची पाहणी, खतखड्यांचे व्यवस्थापन, परिसर स्वच्छता तसेच गृहभेतून मिळणारी माहिती इत्यादी बाबत गुणांकन होणार आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांबाबत थेट निरीक्षणासाठी 120 गुण आहेत. ग्रामस्थांचा प्रतिसादासाठी 100 गुण, गावातील सुविधांचा वापराबाबत 240 गुण तर प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षणा दरम्यान 540 गुणांची प्रश्नावली असणार आहे. एकूण 1000 गुणांपैकी प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे देशातील व महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ सुंदर गाव व ग्रामपंचायत या सर्वेक्षणा दरम्यान घोषित होणार आहे. ही तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत असल्याने गावातील सुविधांचा वापर तसेच बदललेल्या मानसिकतेबाबत कुटुंबांच्या भेटी शिवाय हा उपक्रम कायमस्वरूपी ठेवण्यासाठी गाव पातळीवर झालेली उपायोजना ग्रामस्थांचा सहभाग इत्यादी बाबी प्रामुख्याने पाहणी होणार आहे.
गाव भेटी दरम्यान प्रत्यक्ष निरीक्षण करताना स्वच्छता सुविधांचे निरीक्षण, ग्रामस्थांचा सहभाग जनजागृती दृश्यमान स्वच्छता इत्यादी बाबत पाहणी होणार आहे. गावात गृहभेट होत असताना घरातील स्वच्छतेच्या सुविधांची स्थिती वैयक्तिक शौचालयाचा वापर हात धुण्याच्या सवयी तसेच कुजनारा व नकुजणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण व त्याकरिता असलेली सुविधा शिवाय सांडपाणी व्यवस्थापनाचे केलेले काम इत्यादी बाबत गुणांकन होणार आहे. गाव भेटी दरम्यान रस्त्यावर कुठेही सांडपाणी व घनकचरा पडलेला नाही. शिवाय प्लास्टिक व्यवस्थापन हे कचरा वर्गीकरण केंद्रात केलेले आहे. निर्माण झालेल्या खतखड्यांमधून खत निर्मिती बाबतचे नियोजन केले आहे. शिवाय सांडपाणी व्यवस्थापनाचे काम अतिशय सुरेख झालेले आहे. सार्वजनिक ठिकाणी ही स्वच्छ व नीटनेटकी केलेली आहेत इत्यादी बाबत ही पाहणी होणार आहे.
सार्वजनिक ठिकाणे उदाहरणार्थ धार्मिक स्थळे, शाळा अंगणवाडी परिसर, बाजार तळ या ठिकाणी उघड्यावरती कचरा पडलेला नाही. तसेच सार्वजनिक शौचालयाची सुविधा नीटनेटकी आहे. वापर सुरू आहे, कचरा वर्गीकरणासाठी वर्गीकरण केंद्र आहे आणि हा परिसर स्वच्छ असून मैला गाळ व्यवस्थापनाबाबत सुविधा गावात आहे, अशा प्रकारची पाहणी व गुणांकन होणार आहे. प्लास्टिक संकलन व प्रक्रिया केंद्र तसेच गोवर्धन व मैला गाळ व्यवस्थापन इत्यादीचे पाहणी दरम्यान गुणांकन होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची सुविधा ही आगामी भविष्यकाळात बचत गटांना किंवा इतर व्यवस्थेमार्फत कायमस्वरूपी चालविण्याबाबत सुरू ठेवण्याबाबत ग्रामपंचायतीने शाश्वत उपायोजना केलेली असल्यास त्याचेही गुणांकन यात होणार असल्याने सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच ग्राम पाणीपुरवठा समितीच्या सदस्यांनी काळजी घ्यावी. तसेच स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 मघ्ये जिल्हावासियांनी सहभाग घ्यावा असे आवाहन देखील मुख्य कार्यकारी अधिकारी रविद्र खेबुडकर यांनी केले आहे.
लोगो:-