संदिप गावडे यांच्या हस्ते पारपोली गावठणवाडी व ग्रामपंचायत नजिक येथे बसस्टॉप च्या कामाचे भूमिपूजन…

⚡सावंतवाडी ता.२३-: कै. सुभेदार महादेव भानू परब यांच्या व कै शहिद सुभेदार अंकुश महादेव तेजम यांच्या स्मरणार्थ पारपोली गावठणवाडी तसेच ग्रामपंचायत नजिक नूतन बसस्टॉप च्या उभारणीच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे युवा नेते संदिप गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

पारपोली गावातील नागरिकांना या बसस्टॉप चा नक्की फायदा होईल या उद्देशाने या बसस्टॉप ची उभारणी करण्यात येत आहे तसेच सोनू गांवकर यांचे आम्हाला विशेष सहकार्य लाभले असे श्री गावडे यावेळी म्हणाले. यावेळी मनिष परब, बूथ अध्यक्ष एकनाथ परब, शिवराम परब, शंकर परब, अरुण गावकर, अमित परब, दीपक पास्ते, शुभम गावकर, सिद्धिविनायक गुरव, परेश कलांगण, ज्ञानेश्वर तेजम, कार्तिक तेजम , मैथिली परब, शोभा कलांगण, प्रितेश कलांगण, अक्षय गावकर, संकेत परब, सुभाष गावकर, चंद्रकांत गावकर, भानुदास गावकर, गजानन डांगी, सुहास तेजम,रमेश परब, बुधाजी जाधव, बिपीन गावकर, सुभाष राऊळ, आदी उपस्थित होते..

You cannot copy content of this page