Global Maharashtra Breaking News

मिठबाव रामेश्वर ग्रामदेवालयात झाला, देवतरंग प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न…

दिव्यसोहळा पाहण्यासाठी मिठबाव,तांबळडेग कातवण गावच्या गावघर रयतेची उपस्थिती. ⚡देवगड ता.२४-: देवगड तालुक्यातील मिठबाव तांबळडेग, कातवण गावचे ग्रामदैवत असलेल्या मिठबाव येथील श्री देव रामेश्वर देवालयामध्ये सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी देव तरंग प्राणप्रतिष्ठा सोहळा बारापाच मानकरी संपूर्ण गावघर रयतेच्या उपस्थितीत संपन्न झाला.हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी बारापाच मानकरी ,व मिठबाव तांबळडेग कातवण या तिन्ही गावातील सर्व गावघर…

Read More

नरेंद्राचार्य विरोधात अपमानास्पद वक्तव्य:अनुयायी, शिष्य संतापले…

विजय वडेट्टीवार विरुद्ध मोर्चा काढत फोटोला जोडे मारले.. सिंधुदुर्गनगरी ता २४काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरांतून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून त्यांच्या विरोधात गगनभेदी घोषणा दिल्या. तसेच…

Read More

आगाऊ निधी प्राप्त होवूनही निवृत्त ग्रामसेवकांना वेळेत वेतंन नाही…

३ मार्च पर्यंत वेतन न झाल्यास सीईओ दालनासमोर आंदोलन करण्याचा संघटनेचा इशारा.. सिंधुदुर्गनगरी ता २४सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त ग्रामसेवकांच्या निवृत्तीवेतनासाठी लागणारा निधी राज्य शासना कडून आगाऊ प्राप्त होऊनही निवृत्ती वेतन वेळीच दिले जात नाही. याकड़े मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाच्या वतीने आज निवेदन सादर केले . तर ३ मार्च…

Read More

आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून एकूण नऊ संगणक पंचायत समिती कार्यालयाला सुपूर्त…

⚡सावंतवाडी ता.२४-: माजी शालेय शिक्षण मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून आज चार संगणक सावंतवाडी पंचायत समितीला सुपूर्त करण्यात आले हे संगणक शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्याकडे प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात सुरुवातीला प्रास्ताविक कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी केले यावेळी आमदार…

Read More

कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा – भव्य दिव्य लेझर शोचे आयोजन…

⚡देवगड ता.२४-: बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सौजन्याने यंदाच्या कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेमध्ये भाविकांसाठी भव्य दिव्य लेझर शो आयोजित करण्यात आला आहे. शिवतांडव व बीम शो हे दोन प्रकार यात्रेच्या निमित्ताने भाविकांना अनुभवता येणार आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी दिली आहे. लेझर शो…

Read More

वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या श्रद्धा रावराणे यांची बिनविरोध निवड…

⚡वैभववाडी ता.२४-: वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या श्रद्धा रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर यांनी काम पाहिले सकाळी 11 वाजता वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अधिकृत घोषणा करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष नेहा माईणकर उपनगराध्यक्ष संजय सावंत भाजपचे उपजिल्हाध्यक्ष प्रमोद रावराणे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे दिगंबर पाटील नगरसेवक रणजित तावडे…

Read More

सावंतवाडी येथे परीट समाजातर्फे संत गाडगे महाराज जयंती व स्नेह मेळावा उत्साहात साजरा…!

⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी येथे राष्ट्रसंत श्री संत गाडगे महाराज यांची 149 वी जयंती व सिंधुदुर्गातील परीट समाज बंधू-भगिनींचा तिसरा स्नेह मेळावा सावंतवाडी कळसुलकर हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात पार पडलासावंतवाडी तालुका परीट समाजाच्या वतीने सावंतवाडी नगर परिषदेला राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांच्या नावाने स्वच्छता मोहीम राबवण्याचे निवेदन परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री दिलीप भालेकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांची सिंधुंनगरी येथे खडपकर कुटुंबियांची सांत्वन भेट..

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-:प्रहार चे सिंधुदुर्ग नगरीतील पत्रकार आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सेक्रेटरी बाळ खडपकर यांच्या मातोश्री चे निधन झाल्यानंतर त्यांचे निवासस्थानी जाऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी खडपकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ आदी उपस्थित होते.

Read More

टेम्पो- दुचाकत झालेल्या अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी जागीच ठार…!

⚡वैभववाडी ता.२३-: टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी जागीच ठार झाला आहे. कृष्णा मनोहर ठोंबरे वय 25 रा. जरी बोडका ता. खुलताबाद जि. संभाजीनगर असे मयत तरुणाचे नाव आहे. तर महिला पोलीस कर्मचारी आरती अमर चौगुले वय 21 रा. बिद्री कागल ही गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी सकाळी ७.३०…

Read More

आंगणेवाडी यात्रोत्सवाची मोड यात्रेने सांगता…

⚡मालवण ता.२३-:आंगणेवाडीच्या श्री देवी भराडीच्या यात्रोत्सवाच्या पहिल्या रात्री भाविकांनी अलोट गर्दी केल्याने आंगणेवाडी भक्तिरसात चिंब भिजून गेली शनिवारी यात्रोत्सवात रात्री १० वाजल्या पासून १२ वाजेपर्यंत ताटे लावण्याच्या कार्यक्रमापर्यंत भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला तर या यात्रेचा परमोच्च क्षण म्हणून गणला गेलेला ताटे लावणे आणि प्रसाद वाटपाच्या क्षणाने भाविकजण सुखावून गेला तर आज रविवारी रात्री आंगणेवाडीतील महिलांनी…

Read More
You cannot copy content of this page