Headlines

Global Maharashtra Breaking News

कोकण रेल्वेच्या कंत्राटी गेटमनवर बेरोजगारीची टांगती तलवार…

१ मार्च पासून माजी सैनिकांची गेटमन म्हणून वर्णी लागणार:अन्यायकारक निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा… कुडाळ : कोकण रेल्वे मध्ये गेटमन म्हणून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सिंधुदुर्गातील १५ तरुणांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. प्रभात भट सिक्युरीटी एजन्सी, नवीदिल्ली यांच्या मार्फत जिल्ह्यात गेटमन म्हणून काम करणाऱ्या या तरुणांच्या जागी येत्या १ मार्च पासून माजी सैनिकांना घेतले जाणार आहे. त्यासाठी…

Read Full News

ऑल इंडिया पब्लिक सेक्टर कॅरम स्पर्धेत सावंतवाडीची केशर निर्गुण उपविजेती…

महिला सांघिक गटात एएआय संघास विजेतेपद.. ⚡कुडाळ ता.१५-: दि. 9 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत हाॅटेल सुर्या पॅलेस, बडोदा, गुजरात येथे झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील विविध कंपन्यांचा समावेश असलेल्या ऑल इंडिया पब्लिक सेक्टर स्पोर्ट कंट्रोल बोर्ड आयोजित ऑल इंडिया पब्लिक सेक्टर कॅरम स्पर्धा 25-26 मध्ये सावंतवाडीची राष्ट्रीय कॅरम खेळाडू केशर राजेश निर्गुण हिने वैयक्तीक उपविजेते पदासह…

Read Full News

कुणकेश्वराच्या विकासासाठी कटीबद्ध-:पालकमंत्री नितेश राणे…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-: कोकणाची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वरच्या यात्रेला अनेक वर्षांपासून मी नियमितपणे दर्शनासाठी येत आहे. श्री कुणकेश्वराचे दर्शन घेणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रवासात कुणकेश्वराचा मोठा आशीर्वाद लाभला आहे असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. आज त्यांनी प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री कुणकेश्वर मंदिर…

Read Full News

विशाल परब यांनी श्री देव नागनाथ मंदिर येथे घेतले दर्शन…

⚡दोडामार्ग ता.१५-: तेरवण-मेढे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दोडामार्ग तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तेरवण मेढे येथील जागृत देवस्थान श्री देव नागनाथ मंदिरात भाजप युवा नेते विशाल परब यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री नागनाथाच्या चरणी लीन होऊन जनसेवेसाठी आणि भागाच्या प्रगतीसाठी साकडे घातले. दर्शनानंतर त्यांनी उपस्थित भाविकांशी आपुलकीने संवाद साधला आणि देवस्थान कमिटीने केलेल्या उत्तम नियोजनाचे विशेष…

Read Full News

बांद्यात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात…

⚡बांदा ता.१५-: येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं 1 येथे आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तीन शालेय गटांसह खुल्या गटात संपन्न झालेल्या या स्पर्धेत 100 हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.सविस्तर निकाल पुढीलप्रमाणेदुसरी ते चौथी गट (प्रथम तीन क्रमांक) सार्थक घनश्याम वालावलकर(जिल्हा परिषद शाळा नं…

Read Full News

घारपी शाळेत विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ‘ज्ञानगंगा’ हस्तपुस्तिकेचे दिमाखदार प्रकाशन…

⚡बांदा ता.१५-: घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा, जिद्दीचा आणि कल्पनाशक्तीचा अनोखा आविष्कार ठरलेल्या ‘ज्ञानगंगा’ हस्तपुस्तकेचे प्रकाशन अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडले. शाळेच्या प्रांगणात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, पालकांचा अभिमान आणि शिक्षकांची समाधानाची भावना या सोहळ्याला विशेष अर्थ देणारी ठरली.विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्या लेखनकौशल्याला…

Read Full News

५७ कोटीच्या नळपाणी योजनेच काम चुकीच्या पद्धतीने सुरू…

देव्या सुर्याजी:प्रशासनाने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने काम करावे.. सावंतवाडी : सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत सावंतवाडी शहरासाठी मंजूर झालेल्या सुमारे ५७ कोटीच्या नळपाणी योजनेच काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला. श्री. सुर्याजी व नागरिकांनी चुकीच्या पद्धतीने होणार हे काम बंद पाडले. प्रभारी मुख्याधिकारी व न.प. पाणी पुरवठा विभाग योजनाप्रमूख देखील…

Read Full News

कुडाळ मध्ये न्यू गोल्डन सर्कसचा सर्कसचा शुभारंभ…

चित्तथरारक कसरती आणि जोकर्सच्या गमती जमती.. कुडाळ : मूळ सांगलीचे पण आता कुडाळ भैरववाडी येथील रहिवासी प्रकाश माने यांच्या न्यू गोल्डन सर्कसचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी कुडाळ मध्ये झाला. चित्तथरारक कसरती आणि त्याला विदूषकांच्या गमतीची जोड यामुळे या सर्कसचा शुभरंभाचा प्रयोग उत्तरोत्तर रंगतच गेला.कुडाळ गांधी चौक येथे बांदेकर मैदानात न्यू गोल्डन सर्कसचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी कुडाळच्या…

Read Full News

वेंगुर्ला तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या मागणीची त्वरित दखल…

⚡वेंगुर्ला ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हा आंबा – काजू बागायतदार शेतकरी संघटना व छत्रपती शिवाजी महाराज संघटना यांच्यावतीने शुक्रवारी सकाळी वेंगुर्ला येथे तातडीची बैठक घेऊन कृषी विभागाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आंबा बागांची पाहणी करण्यात येऊन शासनास अहवाल सादर करण्याची कृषी विभागाकडे ठराववजा मागणी करण्यात आली होती. त्यानुसार वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी प्रकाश मोहिते, मंडळ कृषी अधिकारी शंकर…

Read Full News

कोकणातील आंबा नुकसानीबाबत संयुक्त बैठक घेण्यात यावी…

एम. के. गावडे: राज्यकृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदन सादर.. ⚡वेंगुर्ला ता.१८-: सध्याच्या हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळेकोकणातील हापूस आंबाउत्पादक शेतकरी – बागायतदार पूर्णतः नुकसानीत आहे. याबाबतसिंधुदुर्गात एकत्रित आढावा बैठक घेऊन लवकरात लवकर शेतक-यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी, अशी मागणीराष्ट्रवादी काँगेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव एम. के. गावडे यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्रीदत्तात्रय भरणे यांच्याकडे (12 फेब्रुवारी…

Read Full News

You cannot copy content of this page