Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी न प सभापती माधुरी वाडकर यांना मातृशोक..

*सावंतवाडी-:* तालुक्यातील कलंबिस्त येथील रुक्मिणी सावळाराम कलबिस्तकर वय 96 हिचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुलगे चार मुली सुना नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे सावंतवाडी नगर परिषदेच्या समाज कल्याण सभापती माधुरी वाडकर यांची आई होत.

Read Full News

महामार्गाचा नुकसान मोबदला अजुन पेंडिंग आहे…

स्वार्थी लोकप्रतिनिधी टोल वसुलीसाठी आग्रही;मनसे कुडाळ अध्यक्ष गावडेंचा आरोप 💫 *कुडाळ* :- मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या प्रकल्पग्रस्तांना भूसंपादनचा अजून मोबदला मिळाला नाही, तसेच निष्कृष्ट कामामुळे महामार्ग किती काळ टिकेल याची शाश्वती नाही तरीही स्वार्थी लोकप्रतिनिधी टोलवसुलीसाठी आग्रहीआहेत त्यामुळेच प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर असल्याची घणाघाती टिका मनसेचे कुडाळ उपतालुका अध्यक्ष दीपक गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

Read Full News

सावंतवाडीत दंगा कानूनची रंगीत तालीम.

*💫सावंतवाडी दि २४-:* सावंतवाडी शहरात कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक, वरिष्ठांच्या आदेशानुसार दंगा कानुन ची रंगीत तालीम शहरात मोक्याच्या ठिकाणी करण्यात आली आहे. यावेळी सावंतवाडी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली ही रंगीत तालीम करण्यात आली आहे.

Read Full News

संजना सावंत यांच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल…

जिल्ह्यातील ५७ ॲम्बुलन्स घेतली भाडयाने;दरही केले निश्चित पालकमंत्री उदय सामंत यानी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी बैठकीत कोरोना नियंत्रण उपाययोजना सूचविताना जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यानी भाडे तत्वावर ॲम्बुलन्स घेण्याची सूचना केली होती. याची दखल जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यानी तात्काळ घेत सिंधूदुर्ग उपप्रादेशील परिवहन कार्यालयात यासाठी स्वतंत्र ॲम्बुलन्स कंट्रोल रूम सुरु केला आहे. तसेच ५७…

Read Full News

एक्साईजचा अन्य एका दुकानावर छापा…

हाती काही नाही:कारवाईने सावंतवाडीतील बेक़ायदेशीर मद्य विक्री व्यावसायिक अडचणीत *💫सावंतवाडी दि.२४-:* शहरात बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरात आज सकाळीच बेकायदेशीरपणे गोवा बनावटीची दारू विक्री करणाऱ्या युवकाला एक्साईज पथकाने दारू विक्री करताना रंगेहाथ ताब्यात घेतले असून, एका दारू विक्री करणाऱ्या दुकानावर छापा देखील टाकला आहे. परंतु त्या दुकानात काहीच न सापडल्याने त्यांना…

Read Full News

सावंतवाडी न प मध्ये आणखी एक कर्मचारी कोरोना बाधित…

*💫सावंतवाडी दि.२४-:* नगरपालिकेतील आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काल रात्री उशिरा हा अहवाल प्राप्त झाला आहे. यापूर्वी एक कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याने त्याच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी केली असता, आणखी एक कर्मचारी कोरोना बाधित आढळून आला आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Read Full News

सावंतवाडी मच्छी मार्केट परिसरात गोवा बनावटीची दारू विक्री..

एक युवक ताब्यात:एक्साईजची कार्रवाई *💫सावंतवाडी दि.२४-:* सावंतवाडी मच्छी मार्केट परिसरात बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारू विक्री करणाऱ्या प्रवीण देऊलकर (वय ३०) या युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आज साडे दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. ओरोस येथील एक्साईज चा पथकाने ही कारवाई केली आहे.

Read Full News

कुडाळ महिला रुग्णालयातील कोविड सेंटरला आरोग्य सभापतींची भेट…

गैरसोई दूर करण्याच्या केल्या सूचना कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयांमध्ये सुरू केलेल्या कोव्हिड केअर सेंटरला जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सौ. अनिषा दळवी यांनी भेट देऊन या रुग्णालयात असलेल्या गैरसोईंबाबत आरोग्य विभागाला सूचना दिल्या. जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सौ. अनिषा दळवी यांनी आज (शुक्रवारी) कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयमध्ये सुरू केलेल्या कोव्हिड केअर सेंटरला…

Read Full News

*दिवसरात्र सेवा देणाऱ्या पोलिस बांधवांना चहा पाणी देऊन मनसेने मानले आभार

💫 *देवगड* :- गेल्या वर्षभरापासून कोरोना योध्दा म्हणून डाॅक्टराप्रमाणे अहोरात्र सेवा देत असलेल्या देवगड तालुक्यातील पोलिस बांधवाना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व देवगड सहसंपर्क अध्यक्ष श्री संतोष मयेकर यांच्या वतीने आज चहा पाणी देऊन त्याचे आभार मानण्यात आले यावेळी उप तालुका अध्यक्ष महेश नलावडे,बबलु परब,राकेश मिराशी,वैभव आचरेकर, प्रवीण झोरे, निमेश कोकरे आदि कार्येकर्ते उपस्थित होते.

Read Full News

जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी आता ‘ई पास’…

संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा : अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांचे आवाहन *💫सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* कोरोना काळात आंतरराज्य आणि जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी आता ई पास आवश्यक असून अत्यावश्यक कालावधीसाठी संबंधितांनी पोलीस विभागाने दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपला परिपूर्ण अर्ज करावा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. कोरोणाच्या वाढता प्रादुर्भाव आजच्या पार्श्वभूमीवर राज्यात…

Read Full News

You cannot copy content of this page