Headlines

Global Maharashtra Breaking News

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरित भरपाई द्यावी-:अनिशा दळवी…

*💫दोडामार्ग दि.१७ सुमित दळवी-:* तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अंधारात गेला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भागात विजेच्या खांबांवर झाडं कोसल्यामुळे विद्युत पुरवठा व नेटवर्क सुविधा ठिकठिकाणी खंडित झाल्या आहेत. दोडामार्ग तालुक्यातही हीच स्थिती आहे. तालुक्यातील विद्युत पुरवठ्यावर मोठा परीणाम झाला आहे.संचारबंदीच्या काळात मोठ्या अडचणींना सामोर जात असलेल्या सर्वसामान्य जनतेला भयंकर नुकसान सोसावे लागले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्या प्रशासनाकडुन…

Read Full News

आणखी दोन दिवस समुद्र खवळलेला राहणार…

मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये_ *💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात मंगळवार दिनांक 18 मे 2021 रोजी ताशी 65 – 75 ते 85 कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. या कालावधीत समुद्र खबळलेला राहणार असल्याने या कालावधीत नागरिकांनीही समुद्रात किंवा समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये अशा सूचना जिल्हा…

Read Full News

तौत्के चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटता महावितरणल…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* तौत्के चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटा हा महावितरणला बसला असून त्यामुळे महावितरणच्या एकूण 460 विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामध्ये 330 लो टेन्शन आणि 130 हाय टेन्शन विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे. त्याशिवाय जिल्ह्यात 880 विद्युत पोलही तुटले आहेत. विद्युत वितरणच्या नुकसानीचा प्राथमिक आकडा हा सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा आहे. त्याशिवाय वादळामुळे जिल्ह्यातील 21 सब…

Read Full News

तौत्के चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सुमारे 5 कोटी 77 लक्ष रुपयांचे नुकसान…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* तौत्के चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सुमारे 5 कोटी 77 लक्ष 45 हजार 117 रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 60 घरांचे अंशतः तर 12 घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. तर 139 गोठ्यांचे, 19 शाळांचे, 11 शासकीय इमारतींचे, 13 शेड्सचे, 4 सभागृहाचे आणि इतर…

Read Full News

बांदा शाळेच्या सिमरन तेंडोलकरची नागपूर आकाशवाणीवर निवड…

*💫बांदा दि.१७-:* गेल्या वर्षभरापासून कोविड १९च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी प्रथम एज्युकेशन संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रथम संस्थेचा वतीने प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर यांच्या मार्फत शाळे बाहेरची शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी अभ्यासक्रमा संबंधित गप्पा मारून या भागाचे प्रसारण राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत…

Read Full News

शिवसेना नेते संदेश पारकर यांनी तौक्ते वादळाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी…

पालकमंत्री व खासदारांकडे विशेष आर्थिक पॅकेजची केली मागणी_ *💫कणकवली दि.१७-:* तौक्ते वादळाचा मोठा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला असुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संदेश पारकर यांनी देवगड तालुक्याचा दौरा करुन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, मत्स्य अधिकारी तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांची यांची भेट घेऊन त्यांच्याशी नुकसानभरपाई संदर्भात चर्चा केली….

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी ८० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १४ हजार २७२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ८० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. आशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाने जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात अतिवृष्टी झाली आहे. सर्वात जास्त पाऊस सावंतवाडी तालुक्यात 365 मि.मी. झाला असून सर्वात कमी पाऊस वैभववाडी तालुक्यात 149 मि.मी. इतका झाला आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 748 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सरासरी 218 पूर्णांक 5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील…

Read Full News

सावंतवाडीतील वकिल ॲड. अलसुहेब डिंगणकर यांचे निधन..

वकिली क्षेत्रात व्यक्त होत आहे हळहळ *💫सावंतवाडी दि.१७-:* सावंतवाडी सालईवाडा येथील प्रसिद्ध वकील अलसुहेब सत्तार डिंगणकर (४८) यांचे आज अल्पशा आजाराने कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर सुरु होते.।त्यातच आज सकाळी।त्यांची प्राणज्योत मालवली. गेली २४ वर्षे ते सावंतवाडीतील न्यायालयात वकिली करत होते. त्यांचे वडील ॲड. सत्तार डिंगणकर हे देखील वकील…

Read Full News

देवगड तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून

एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता *💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* तौक्ते चक्रीवादळाच्या फटक्यामुळे देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये राजाराम कृष्णा कदम, रा. गढीताम्हणे, ता. देवगड या खलाशाचा मृत्यू झाला आहे. तर दिनानाथ जोशी रा. पावस, रत्नागिरी, नंदकुमार नार्वेकर रा. कोल्हापूर, प्रकाश गिरीद, रा. राजापूर, रत्नागिरी हे…

Read Full News

You cannot copy content of this page