Headlines

Global Maharashtra Breaking News

५० भाषांत तयार केलेल्या पर्यटन स्थळ माहितीचे सुरेश प्रभु करणार लोकार्पण

*💫मालवण दि.०६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांविषयी माहिती टूर एजंट तसेच पर्यटनासाठी जिल्ह्यात येणाऱ्या देश विदेशातील नागरिकांना त्यांच्या स्थानिक भाषेत उपलब्ध झाल्यास जिल्हात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने मंगळवार दि ८ जून रोजी सकाळी ११ वाजता खासदार श्री सुरेशजी प्रभू यांच्या हस्ते व्हर्च्युअल सभेच्या माध्यमातून ५० पेक्षा जास्त भाषा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन स्थळांची माहिती…

Read Full News

एलआयसी एजंट गोविंद घळसाशी यांचे निधन

*💫सावंतवाडी दि.०६-:* येथील तालुक्यातील प्रसिद्ध एलआयसी एजंट तसेच इलेक्ट्रिक गाड्याचे वितरक माजगांवचे रहिवासी गोविंद घळसाशी(वय ४९) यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने माजगाव गावात हळहळ व्यक्त होत आहे. घाळसाशी नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर होते. प्रायोजित नाटकाची त्यांना आवड होती. त्यांनी अनेक प्रायोजित नाटकात अभिनव देखील केले आहेत. शितीज इव्हेंट ग्रुपचे ते प्रमुख…

Read Full News

चिंदर ग्रामपंचायत येथे पर्यावरण दिन साजरा…

*💫मालवण दि०६-:* जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने चिंदरच्या सरपंच सौ.राजश्री कोदे आणि उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते ग्रामपंचायत आवारात कल्पवृक्ष रोपण करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी पि.जि. कदम, तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष गांवकर, कृषी मित्र गोपाळ लब्दे, पोलिस पाटिल दिनेश पाताडे, कर्मचारी विश्राम माळगावकर, रणजित दत्तदास, आबा पवार, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Full News

त्रिंबक येथील ग्रामविलगीकरण कक्षाला दानशूर व्यक्तींकडून वैद्यकीय उपकरणे भेट

*💫मालवण दि.०६-:* त्रिंबक येथील ग्रामविलगीकरण कक्षाला आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे गावातील दानशूर व्यक्तींकडून भेट देण्यात आली आहेत. यात दिगंबर साटम यांच्या कडून तीन थर्मल गन ,सुनील वसंत नाईकसाटम यांच्या कडून तीन आँक्सिमिटर,संजय चंद्रकांत वेंगुर्लेकर यांच्या कडून दहा पीपीई किट,पल्लवी केशव जोशी यांच्या कडून गरम पाण्यासाठी आवश्यक शेगडी व टोप देण्यात आला आहे. त्यांच्या या सहकार्याबद्दल…

Read Full News

कोरोनासाठी मिथिलीन ब्ल्यू औषधाला शासनाने त्वरित परवानगी द्यावी

नगरसेवक अँड. परिमल नाईक यांची मागणी *💫सावंतवाडी दि.०६-:* कोरोना विषाणूंचा नायनाट करण्यासाठी मिथिलीन ब्लु औषध रामबाण उपाय म्हणून ठरणार असल्याने मीथिलिन ब्ल्यू औषध तयार करण्यासाठी शासनाने ताबडतोप परवानगी द्यावी अशी मागणी नगरसेवक अँड. परिमल नाईक, यांनी केली आहे. प्रसिद्ध पत्रकात नाईक म्हणाले १४० वर्षाहून जास्त काळातील मिथिलीन ब्लु औषध कोरोना बाधित रुग्णांसाठी रामबाण औषध ठरणार…

Read Full News

पोल्युशनला सोल्युशन असायला हवं महिलांनी पर्यावरणपूरक मासिक पाळीचा कप पर्याय स्वीकारावा-: मनीषा घेवारी

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* मासिक पाळीसाठी वापरण्यात येणारा पॅड हा आठशे ते साडे आठशे वर्ष पर्यावरणात तसाच राहतो. त्यासाठी पोल्युशनला सोल्युशन असायला हवं. पर्यावरण वाचवण्यासाठी पर्यावरणपूरक मासिक पाळीचा कप महिलांनी पर्याय म्हणून स्वीकारावा, असा सल्ला सांगली येथील शिक्षिका मनीषा घेवारी यांनी दिला. महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविमच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन बचत गटांच्या महिलांसाठी व्याख्यान…

Read Full News

विरोधकांनी किती अडचणी आणल्यातरी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे लसिकरण होणारच

आ नितेश राणेंची ग्वाही कणकवली 6 जून – किती अडचणी विरोधकांनी निर्माण करण्याचे प्रयत्न केले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकाराचे लसीकरण होणारच असे असे आम.नितेश राणे पत्रकारांच्या लसीकरणाच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. भारतीय जनता पक्षचे कार्यकर्ते कोणते ही राजकारण नकरता जनतेची सेवा करत आहे.पण राजकारण नेमके येथे कोण करतय याच विषयात नव्हे तर अन्यविषयात ही…

Read Full News

छत्रपतींच्या स्त्रीविषयक धोरणाचा उत्तम नमुना यादवाडचे शिल्प

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत *💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्त्री विषयक धोरणाचा उत्तम नमुना कर्नाटकातील यादवाड येथील शिल्प आहे. या शिल्पाला भेट देऊन इतिहास जाणून घेतल्यास महाराजांचा महिलांविषयीचा दृष्टीकोन किती विशाल होता हे दिसून येते, असे गौरवौद्गार इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी काढले. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शिवस्वराज्य दिनानिमित्त आज ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले होते….

Read Full News

‘…गर्जतो महाराष्ट्र माझा’ अन पोवाड्यात शिवस्वराज्य दिन उत्साहात

जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते उभारली शिवशक राजदंड स्वराजगुढी *💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* आंब्यांच्या पानांची आणि फुलांची तोरणे…सुबक नक्षीदार काढलेली रांगोळी…शौर्याची गाथा पोवाडा, राष्ट्रगीत अन गर्जतो महाराष्ट्र माझा… या गिताच्या ऊर्जेमय वातावरणात आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराजगुढीचे…

Read Full News

कणकवली पंचायत समितीत स्वराज्यगुडी उभारून केले अभिवादन…

*💫कणकवली दि.०६-:* महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्या निमित्त शासकीय परिपत्रकानुसार कणकवली पंचायत समितीने नवीन इमारती मध्ये भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुडी उभारून त्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी यावेळी पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर ,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण ,विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग ,पंचायत समिती सदस्य मिलींद मेस्त्री, मराठा समाजाच्या…

Read Full News

You cannot copy content of this page