आ नितेश राणेंची ग्वाही
कणकवली 6 जून – किती अडचणी विरोधकांनी निर्माण करण्याचे प्रयत्न केले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकाराचे लसीकरण होणारच असे असे आम.नितेश राणे पत्रकारांच्या लसीकरणाच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. भारतीय जनता पक्षचे कार्यकर्ते कोणते ही राजकारण नकरता जनतेची सेवा करत आहे.पण राजकारण नेमके येथे कोण करतय याच विषयात नव्हे तर अन्यविषयात ही याचा विचार विरोधकांनी करावा.तसेच जि.प.चे सीईओ तरुण व नवीन असून त्यांना अनुभव थोडा कमी आहे.त्यांना कदाचित माहीत नसावे गेले 25 वर्ष सिंधुदुर्गाच्या जी.प.मध्ये राणे साहेबांचे वर्चस्व आहे.अशा सीईओना चांगली शिकवण कशी द्यायची हे आम्हाला माहिती आहे.आमच्या जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकाराचे लसीकरण होणारच असे सांगतानाच त्यांच्या अनुभवात भर येणाऱ्या दिवसात निश्चित टाकू.असे आम.नितेश राणे पत्रकारांच्या लसीकरणाच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. यावेळी जि.प.अध्यक्षा संजना सावंत,सभापती मनोज रावराणे,नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
