कोरोनासाठी मिथिलीन ब्ल्यू औषधाला शासनाने त्वरित परवानगी द्यावी

नगरसेवक अँड. परिमल नाईक यांची मागणी

*💫सावंतवाडी दि.०६-:* कोरोना विषाणूंचा नायनाट करण्यासाठी मिथिलीन ब्लु औषध रामबाण उपाय म्हणून ठरणार असल्याने मीथिलिन ब्ल्यू औषध तयार करण्यासाठी शासनाने ताबडतोप परवानगी द्यावी अशी मागणी नगरसेवक अँड. परिमल नाईक, यांनी केली आहे. प्रसिद्ध पत्रकात नाईक म्हणाले १४० वर्षाहून जास्त काळातील मिथिलीन ब्लु औषध कोरोना बाधित रुग्णांसाठी रामबाण औषध ठरणार असून वर्तमानकालीन महामारीच्या गंभीर परिस्थिती मध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करत असताना वापरण्यात येत असलेल्या औषधांची गुणवत्ता, तुटवडा, व अवाजवी किंमत या बाबत रुग्ण -नातेवाईक तसेच वैधकीय क्षेत्रासहित समाजात एक संभ्रमावस्था निर्माण झालेलीआहे. देश व परदेशात या पूर्वी मिथिलीन ब्लु चा वापर प्रभावी पणे इतर दुर्धर आजारावर सुद्धा करण्यात आलेला असून अतिशय अल्प दरात व सहजरीत्या उपलब्ध होणाऱ्या तसेच जाणकार वैधकीय अभ्यासकांच्या परिनिरीक्षणा नुसार सदर औषध हे अँटी व्हायरल, अँटी बँकटेरिअल आणि अँटी फँगल तसेच हे औषधं कोरोना पूर्वी व कोरोना नंतर सुद्धा प्रभावी कार्य करत असल्यामुळे या औषधाला शासनाने अर्सेनिक अल्बम किंवा तत्सम स्वरूपाच्या औषधाना जशी मान्यता दिली त्या धर्तीवर लवकरात लवकर मान्यता द्यावी. तसेच वैधकीय व्यवसायिकानी सुद्धा चार पाऊले पुढे येऊन अभ्यास पूर्वक प्रभोधन करून नागरिकांमध्ये जनजागृती करावी व कोरणा विषाणू नष्ट करावा यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी पुढे यावे तसेच शासनाने मिलिन ब्ल्यू या औषध निर्मितीला ताबडतोब मान्यता द्यावी अशी मागणी नगरसेवक अँड. परीमल नाईक यांनी केली आहे

You cannot copy content of this page