Headlines

Global Maharashtra Breaking News

भंडारी हायस्कूलमध्ये योगदीन साजरा

मालवण : (प्रतिनिधी) भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय मालवण यांच्या वतीने जागतिक योग दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. गत वर्षी व यावर्षी सुद्धा कोरोनामुळे महाविद्यालय बंद आहेत. या पार्श्वभूमीवर भंडारी कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिन ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ज्युनिअर कॉलेजच्या सुमारे ५० मुला- मुलींनी उस्फुर्त सहभाग दर्शवला. प्राध्यापक पवन बांदेकर…

Read Full News

ओटवणे गावातील वीज समस्या सोडविणार

धारवेर धरल्यानंतर ग्रामस्थाना वीज अधिकाऱ्यांचे आश्वासन सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावात होत असलेल्या अनियमितपणे होत असलेल्या विज पुरवठा संदर्भात आज ओटवणे ग्रामस्थांनी उपअभियंता भुरे व सहाय्यक अभियंता बोथरे याना धारेवर धरत सावंतवाडी मधून वीज जोडणी द्या अन्यथा गणेश उत्सवापूर्वी आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे. अखेर 2 तासाच्या चर्चेनंतर उपअभियंता भुरे यांनी चालू असलेला वीज पुरवठा…

Read Full News

दुर्मिळ रक्तदात्यांनी जपली सामाजिक बांधिलकी;…

युवा रक्तदाता संघटनेचे विशेष प्रयत्न_ *💫सावंतवाडी दि.२२-:* उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या आप्पासाहेब करनुरे (वय ७८) या रुग्णाला तातडीने B- निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता होती. यावेळी कोलगाव‌ येथील सिद्धेश नाईक, भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय सावंतवाडीचे विद्यार्थी वैभव मस्के यांनी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये येऊन रक्तदान केले. कोव्हीड काळात अतिदुर्मिळ असलेल्या या रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक…

Read Full News

कणकवली परबवाडी येथे कोविड 19 चा डेल्टा प्लस बाधीत

आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपाययोजना सुरू-:डॉ श्रीपाद पाटील *💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* जिल्ह्यात कोविड 19 आजाराचा नवीन स्ट्रेन ( डेल्टा प्लस ) कणकवली परबवाडी येथे सापडला असून, बाधीत भागात आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आज दिली. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे, आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड 19…

Read Full News

सण वटपौर्णिमेचा

खरेदिसाठी बाजारपेठेत लगबग *💫सावंतवाडी दि.२२ प्रसन्न गोंदावळे-:* वटपौर्णिमा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने या सणासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग वाढली आहे. वटपौर्णिमा सण जवळ आल्याने सणासाठी लागणाऱ्या सामानाची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. गावागावातील छोट्या मोठ्या विक्रेत्यांनी रस्त्याच्या बाजूला आपली दुकाने थाटली असून अननस, तोतापुरी आंबे, वटपौर्णिमेसाठी लागणारे दोरे काकणांचे चुडे आदी सामान…

Read Full News

बोगस डॉक्टर्स शोधून कारवाई करा

गेल्या तीन वर्षातील रुग्णालयनिहाय मृत्यूंचा अहवाल सादर करावा-: पालकमंत्री उदय सामंत *💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* कोविडच्या महामारीचा लाभ घेऊन काही बोगस डॉक्टर्स चुकीचे उपचार करण्याची शक्यता आहे. अशा डॉक्टरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. विशेषतः वैभववाडी आणि दोडामार्ग याठिकाणी लक्ष केंद्रीत करावे. गेल्या तीन वर्षात विविध कारणांनी झालेल्या मृत्यूंचा रुग्णालयनिहाय अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत…

Read Full News

कोणी अंगावर आला तर शिंगावर घेण्याचा पायंडा कै. श्रीधर नाईक यांनी पाडला

ना. उदय सामंत;कै. श्रीधरराव नाईक यांचा ३० वा स्मृतिदिन कणकवलीत साजरा* *💫कणकवली दि.२२-:* २२ जून हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातला काळा दिवस आहे. या दिवशी जिल्ह्यातील दहशतीमुळे श्रीधर नाईक यांची राजकीय हत्या झाली.राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारे हे नेते होते.दहशती विरोधात लढण्यासाठी कोणी अंगावर आला तर शिंगावर घेण्याचा पायंडा त्यांनी जिल्ह्यात पाडुन दिला आहे. कार्यकर्त्यांना अनेक…

Read Full News

रूग्णवाहीका वाहन चालकांना विमा सुरक्षा कवचाचे आम.नितेश राणे यांच्याहस्ते वितरण

कणकवली सभापती मनोज रावराणे यांनी राबविला उपक्रम *💫कणकवली दि.२२-:* आम.नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्या पुढाकाराने कणकवली तालूक्यातील 7 प्राथमिक आरोग्य केंद्रातील व उपजिल्हा रूग्णालयातील 2 असे एकूण 9 रूग्णवाहीकांवरील वाहन चालकांना सुरक्षा कवच म्हणून कोरोना काळात विमा संरक्षण देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ आम.नितेश राणे यांच्याहस्ते करण्यात आला. विमा संरक्षण…

Read Full News

नियमांचे पालन केल्यास धोका टळेल

राजू मुळीक : आरोस गिरोबा विद्यालयात विलगिकरण कक्ष सुरू *💫बांदा दि.२२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यासह भारतात दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. मात्र अद्यापही रुग्णसंख्या व मृत्युचे प्रमाणही चिंताजनकच आहे. या पार्श्वभूमीवर संशोधकांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवलेली आहे. त्यासाठी आरोस गावासह जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत तिसऱ्या लाटेला परतवून लावण्याचे आवाहन, जि.प.सदस्य राजन उर्फ…

Read Full News

आंबोली दुरक्षेत्रचे पोलिस हेंड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांना पितृशोक

*💫सावंतवाडी दि.२२-:* आंबोली दुरक्षेत्र चे पोलीस हेंड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांच्या वडिलांचे काल सायंकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. कै. मेजर गणपतराव शंकरराव देसाई ( वय ८६) असे त्यांचे नाव असून, कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे त्यांच्या मूळ गावी राहत्या घरात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Read Full News

You cannot copy content of this page