कणकवलीतील सेवानिवृत्त प.स.अधीक्षक वाय. पी. राणे यांचे निधन
*ð«कणकवली दि.२७-:* पंचायत समितीचे सेवानिवृत्त अधीक्षक यशवंत पांडुरंग उर्फ वाय. पी. राणे (75) यांचे शनिवारी रात्री 9 वा. च्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने कणकवली येथील निवासस्थानी निधन झाले. मूळ साकेडी – बोरीचीवाडी येथील असलेले वाय. पी. राणे हे गेली अनेक वर्षे कणकवली नाथ पै नगर येथे वास्तव्यास होते.त्यांच्यावर कणकवलीतील स्मशानभूमीत रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले….
