गोळवण धगरवाडीतील बाबू खरात यांना मदतीचा हात

युवासेनेचे पंकज वर्दम यांची तौक्ते नुकसानग्रस्ताना मदत सुरुच

*💫मालवण दि.२७-:* दीड महिन्यांपूर्वी आलेल्या महासंहारक तौक्ते चक्री वादळाने जिल्ह्यात साऱ्यांची दाणादाण उडवून देत जगणे मुश्किल बनविले काहींचे तर होत्याचे नव्हते केले… काहींच्या माडबागायती उध्वस्त केल्या तर काहींची घरं जमीनदोस्त केली …. ज्यांची घरं वाचली त्यांच्या डोक्यावरचं छप्परचं वादळानं हिरावून नेलं. आधीच कोरोनाच्या कहरामुळे सारे काही विषण्ण झालेले असताना या आक्रमणाला तोंड देण्यासाठी सामाजिक संस्था,व्यक्ती पुढे येत असून मालवण तालुक्यात सद्या गरजू लोकांसाठी मदतीचा स्त्रोत बनलेल्या पोईप येथील शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम यांचे मदतीचे हात गोळवण धनगरवाडी मधील बाबू विठु खरात‌‌ यांच्यासाठी सरसावले आहेत . गोळवण धनगरवाडी येथे राहणाऱ्या बाबू विठु खरात‌ यांच्या घराला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून घरावर फणसाचे झाड पडुन‌ घराचे मोठे नुकसान झाले होते. गोळवण मधील धनगरवाडी ही अतिदुर्गम भागात असल्यामुळे या ठिकाणी अनेकजण पोहोचूनही मदतीचा हात मिळाला नाही‌ मात्र शिवसेना पदाधिकारी‌ आनंद चिरमुले यांना माहिती मिळताच त्यांनी आपले सहकारी अक्षय दाभोळकर यांना सोबत घेऊन त्या घराची पाहणी करत त्या कुटुंबाला मदत मिळून देण्याचा शब्द देत शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम याना मदतीसाठी हाक दिली. श्री वर्दम यांनी त्या हाकेला प्रतिसाद देत बाबू खरात‌ यांच्या कुटुंबाला मदतीचा हात पुढे करून घरासाठी पत्रे देऊन डोक्यावर छप्पर दिल्याने या कुटुंबाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलले आहे . यावेळी बोलताना वर्दम म्हणाले ऐंशी टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ म्हणत जनसामान्यांसाठी धावत येणारी संघटना म्हणजे फक्त ‘शिवसेना’‌ आहे. यावेळी शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम युवासेनेचे आनंद चिरमुले, किरण प्रभु, विजय पालव, पराग,नार्वेकर,श्रीकृष्ण पाटकर, संजय पाताडे,‌भाऊ चव्हाण, प्राजक्ता परब,प्रविण चिरमुले, बाबू चिरमुले उपस्थित होते.

You cannot copy content of this page