मनसेच्यावतीने माजगाव कुंभारवाडा येथे हायपो क्लोराइड सोडियमची फवारणी

*शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या पुढाकारातून फवारणी

*💫सावंतवाडी दि.२७-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडीच्यावतीने माजगाव कुंभारवाडा येथे हायपो क्लोराइड सोडियमची फवारणी करण्यात आली मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनानुसार कुडाळ तालुका सचिव राजेश टंगसाळी महाराष्ट्र सैनिक दिपक गुराम यांच्या सहकार्याने मनसे सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आले कुंभारवाडा येथे करोना रुग्ण आढळत आहेत. सदर बाब तेथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत हरमलकर यांच्या लक्षात येताच त्यांनी सावंतवाडी मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्याशी संपर्क केला व त्वरित श्री सुभेदार यांनी त्या ठिकाणी सोडियम हायपो क्लोराईडला लागणाऱ्या वस्तू उपलब्ध करून श्री हरमलकर यांच्याकडे सुपूर्द केले व आज पासून त्या ठिकाणी फवारणी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती उपशहर अध्यक्ष श्री शुभम सावंत यांनी दिली तसेच करोना संक्रमण कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व ठिकाणी फवारणी करण्यात येणार आहे असे यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यावेळी उपस्थित मनसे सावंतवाडी शहराध्यक्ष अशिष सुभेदार कार्याध्यक्ष संतोष भैरवकर उपशहर अध्यक्ष शुभम सावंत सचिव आकाश परब ऋग्वेद सावंत धनंजय पाटकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page