कणकवलीतील सेवानिवृत्त प.स.अधीक्षक वाय. पी. राणे यांचे निधन

*💫कणकवली दि.२७-:* पंचायत समितीचे सेवानिवृत्त अधीक्षक यशवंत पांडुरंग उर्फ वाय. पी. राणे (75) यांचे शनिवारी रात्री 9 वा. च्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने कणकवली येथील निवासस्थानी निधन झाले. मूळ साकेडी – बोरीचीवाडी येथील असलेले वाय. पी. राणे हे गेली अनेक वर्षे कणकवली नाथ पै नगर येथे वास्तव्यास होते.त्यांच्यावर कणकवलीतील स्मशानभूमीत रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या सेवेत अनेक वर्षे त्यांनी कणकवली, वैभववाडी, ओरोस अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम केले होते. कणकवली पंचायत समिती येथे काही वर्षांपूर्वी ते अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. जिल्हा परिषदेच्या सेवेत असताना नागरिकांची कामे प्राधान्याने करण्यावर त्यांचा कटाक्ष असे. जि. प च्या सेवेत असताना त्यांनी काही तरुणांना जि. प. च्या सेवेत सामावून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. वाय. पी .याच नावाने ते सर्वांच्या परिचित होते. स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघाचे संदीप राणे यांचे ते वडील तर साकेडी सरपंच रीना राणे यांचे चुलत सासरे तर कणकवली एसटी आगारातील वाहक असलेले रामप्रभू राणे यांचे काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page