Headlines

Global Maharashtra Breaking News

रस्त्यावर चिखलमय माती पडून वाहतुकीस अडथळा

*💫कणकवली दि.२९-:* मुंबई गोवा महामार्गावर कणकवली शहरातील सारस्वत बँकेसमोरील सर्व्हिस रोडवर सायंकाळी 4 च्या सुमारास चिखलमय माती डंपर मधून पडल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा होत आहे पावसाचे प्रमाणही कमी असल्याने माती वाहून न जाता रस्तावर पसरत आहे. त्यामुळे वेगाने जाणाऱ्या दुचाकी गाड्या घसरून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Read Full News

वीजबिल भरण्यास सवलत मिळावी

कोरोना महामारीमुळे संकटात सापडलेल्या व्यावसायिकांची वीज वितरणकडे मागणी *💫मालवण दि.२९-:* कोरोना महामारी लॉकडाऊन तौक्ते चक्री वादळ या संकटांमुळे वायरी, भूतनाथ, तारकर्ली, देवबाग येथील पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याने वीज बिलाचा भरणा करण्यासाठी व्यावसायिकांनी पैसे आणायचे कुठून. आर्थिक नुकसान कर्जाचा डोंगर यामुळे आमची कुटुंबे जगणार कशी असे सवाल करीत वायरी, तारकर्ली, देवबाग मधील पर्यटन व्यावसायिकांनी आज मालवणातील…

Read Full News

१५ वित्त आयोग संदर्भातील अडचणींबाबत आम.नितेश राणेंचे वेधले लक्ष

ग्रामपंचयायतींची होणारी पिळवणूक थांबवण्याची केली मागणी *💫कणकवली दि.२९-:* १४ वा वित्त आयोगानंतर १५ वा वित्त आयोग कार्यरत आहे मात्र १५ वा वित्त आयोगाअंतर्गत काम पूर्ण झाल्यावर संबधीत ठेकेदाराचे ई पेमेंट करायचे असल्याने बरीचशी कामे पूर्ण करूनही याचे पेमेंट अजूनपर्यंत झालेले नाही यामुळे ई पेमेंट करताना अडचणी येत असून याबाबत कणकवली तालूका सरपंच संघटनेने मुख्यकार्यकारी अधिकारी…

Read Full News

त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पालकमंत्र्यांकडून पन्नास हजार रुपयांची तात्काळ मदत

शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरींचा पाठपुरावा;तात्काळ बाब म्हणून नुकसानीचा प्रस्ताव सादर करण्याच्या तिलारीच्या अधिकाऱ्यांना केल्या सूचना *💫दोडामार्ग दि.२९-:* आवाडे येथिल शेतकरी रमेश नाईक यांचे दोन रेडे शेतातून घरी येत असताना आचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे नदीच्या पाण्यात वाहून गेले होते. सुदैवाने एक रेडा वाचला व एक रेडा मरण पावला होता. मृत्यु झालेल्या रेड्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी…

Read Full News

जिल्हा बँकेच्या अद्ययावत डाटा सेंटरचे शरद पवार करणार लोकार्पण

३८ व्या वर्धापन दिनी १ जुलै रोजी ऑनलाईन होणार शुभारंभ;सतीश सावंत यांची माहिती *💫ओरोस दि.२९-:* सिंधूदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ३८ वा वर्धापन दिन १ जुलै होत आहे. यावेळी विविध सामाजिक, सहकार क्षेत्राला भक्कम करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २०१२ पासून कार्यरत असलेल्या बँकेच्या डाटा सेंटरचे अद्यावतीकरण करण्यात आले आहे. टायर थ्री ही सिस्टीम…

Read Full News

पत्रकारांची मागणी योग्यच

मी आणि धनंजय मुंडे स्वतः मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार;राष्टवादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन *💫सावंतवाडी दि.२९-:* पत्रकार नेहमी जीव धोक्यात घालून मागील वर्षापासून कोविड काळात काम करीत आहेत, त्यामुळे पत्रकार संघाने केलेली मागणी योग्य असून दौरा आटोपल्यानंतर आपण स्वतः आणि धनंजय मुंडे पत्रकारांना फ्रेन्ट लाईन वर्कर म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मुख्यमंत्र्यांकडे…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी ३०१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३४ हजार ६८१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ५७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३०१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

मालवण तंत्रनिकेतन येथे जिल्हास्तरिय युवा सिंधु प्रश्नमंजूषा

दहावी मुलांसाठी १ जुलै रोजी आयोजन *💫मालवण दि.२९-:* शासकीय तंत्रनिकेतन, मालवणच्या वतीने १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरीय युवासिंधु प्रश्नमंजुषा स्पर्धा -२०२१ ही स्पर्धा दि. १ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा चालु घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, बेसिक इंग्रजी व गणित या विषयावर आधारित असून विजेत्या प्रथम क्रमांक रुपये १००१ रोख,…

Read Full News

कोरोना लस घेतलेल्या नागरिकांना गोव्यात जाण्यासाठी आरटीपीसीआर नको

सेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांची मागणी *💫सावंतवाडी दि.२९-:* गोव्यात नेहमी ये-जा करणाऱ्या नोकरीसाठी किंवा अन्य कामासाठी जाणाऱ्या येणाऱ्यानी कोविड प्रतिबंधक लस घेतली असेल तर त्यांची पुन्हा आरटीसीपीआर तपासणीची सक्ती केली जाऊ नये अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली आहे. सिंधुदुर्गातून (स्थानिक) गोव्यात नोकरीसाठी किंवा अन्य कामासाठी जाणाऱ्या येणाऱ्यानी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे….

Read Full News

इनोव्हाने ठोकरल्याने बैल जागीच गतप्राण

मळगाव धाबा सर्कल जवळील घटना *💫सावंतवाडी दि.२९-:* झाराप-पत्रादेवी बायपासवर मळगाव येथील स्वामी धाबा सर्कल लगत अचानकपणे रस्त्यावर आलेल्या बैलाला इनोव्हा कारची धडक बसल्याने बैल जागीच गतप्राण झाला. या अपघातात इनोव्हा कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. ही कार बांदा येथून वेंगुर्ला येथे जात होती. अचानकपणे बैल आडवा आल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न कार चालकाने केला मात्र…

Read Full News

You cannot copy content of this page