Headlines

Global Maharashtra Breaking News

*केवळ राज्य सरकार पडेल या भीतीने भाजपच्या १२ आमदारांना विधानसभेतून निलंबित

*माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा आरोप *💫सिंधुदुर्ग दि.०५ प्रसन्न गोंदावळे- :* राज्य सरकार पडेल या भीतीने केवळ आपले सरकार वाचवून आपले दुकान चालू ठेवण्यासाठी आज भाजपच्या १२ आमदारांना विधान सभेतून निलंबित करण्यात आले, असा घणागाती आरोप माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज पडवे येथील आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन…

Read Full News

वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

इतरांनी फुकटचे श्रेय घेऊ नये;सतीश सावंत यांचा विरोधकाना टोला *💫कणकवली दि.०५-:* उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांच्या माध्यमातून जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या मागणीनुसार कणकवली तालुक्यातील वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्त करण्यात आले.जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत व जिल्हा सदस्या सौ. स्वरूपा विखाळे यांच्या हस्ते हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. यावेळी डॉ रूपाली वळंजू…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी २७२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३६ हजार १६८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २७२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

रोटरी सदस्यांनी सकारात्मक दृष्टी ठेवून जबाबदारी स्वीकारावी

रोटरी क्लबचे डिजीइ व्यंकटेश देशपांडे यांचे मालवणच्या पदग्रहण सोहळ्यात प्रतिपादन *💫मालवण दि.०५-:* रोटरी क्लब दरवर्षी निरनिराळी ब्रीद वाक्य घेऊन काम करीत असली तरी समाजाची सेवा करणे हा रोटरी क्लबचा मूळ हेतू कायम आहे दृष्टी, श्रद्धा, विश्वास, आशा आणि आत्मविश्वास या पाच गोष्टींवर रोटरी क्लबचे कार्य चालत असल्याने रोटरी सदस्यांनी आपली दृष्टी सकारात्मक ठेवून समाजात चांगल्या…

Read Full News

प्रवास करून परतणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनीही केली चाचणी सर्व प्रवाशांनी चाचणी करून घ्यावी

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* केरळ राज्यातील मूळ गावाहून सिंधुदुर्गनगरीत आज सकाळी परतलेल्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि पती सबरीश पिल्लई यांनी कुडाळ रेल्वेस्थानकात कोरोनाची चाचणी आरोग्य पथकाकडून करून घेतली. जिल्ह्यात परतणाऱ्या सर्वच प्रवाश्यांनी भीती न बाळगता आपली कोरोना चाचणी करुन सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले. जिल्हाधिकारी श्रीमती मंजुलक्ष्मी या केरळ येथील आपल्या मूळगावी…

Read Full News

इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हल्यू संस्थेमार्फत कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर

कणकवली दि.०५ इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हल्यू या संस्थेमार्फत भारतीय जनता पार्टीने विंनती केल्याप्रमाणे 10 लिटरचे 3 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपजिल्हा रुग्णालय कणकवलीला देण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी पुनीत पटेल, नरोलम पटेल, सुभाष पटेल, हिरेन पटेल तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. संजना सावंत, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, बबलू…

Read Full News

केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत राष्ट्रवादीने नोंदविला निषेध

महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले;अनंत पिळणकर यांचा आरोप *💫कणकवली दि.०५-:* वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून महागाई दर नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरल्याबद्दल केंद्र सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तालुका राष्ट्रवादीच्यावतीने निषेध करण्यात आला.केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून महागाई कमी करा अन्यथा जनतेसाठी आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला….

Read Full News

कोरोना लसिकरण बाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध करा

लोकांमध्ये आहे संभ्रम:भाजप मंडळ अध्यक्ष गोंदावळे यांची मागणी *💫सावंतवाडी दि.०५-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सद्य स्थितीत लसीकरण केंद्रावर गोंधळ होत आहे. केंद्रावर १६० डोस आले असताना, किती ऑनलाईन दिले?, किती ऑफलाईन दिले?, किती सेंकड डोस दिले? याची माहिती दररोज मिळणे गरजेचे आहे. अशी मागणी भाजप सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक…

Read Full News

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची ८४ वी पुण्यतिथी साजरी

पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजन *💫सावंतवाडी दि.०५-:* महात्मा गांधींनी “रामराजा” अशी उपमा दिलेले आणि ज्यांच्या राज्याला “रामराज्य” असे संबोधले होते. असे संस्थांचे भूतपूर्व राजे ‘श्री पंचम खेमराज तथा पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज’ यांची ८४ वी पुण्यतिथी श्री पंचम खेमराज महाविद्यालयात आज साजरी करण्यात आली आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोसले यांच्या हस्ते…

Read Full News

पोलिसांना पाहुन मागे पळणाऱ्या दारू वाहतूक स्विफ्ट कारची अन्य वाहनाला धडक

कारवाईसाठी सज्ज पोलिसांना गुंगारा देण्याचा होता प्रयत्न;अपघातात दोघे जखमी *💫मालवण दि.०५-:* वेंगुर्ला येथून देवगडच्या दिशेने सुमारे दीड लाख रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारूची वाहतूक करणारी स्वीप्ट गाडी आचरा पारवाडी येथील पुलावर पोलिसांनी पकडल्याची घटना आज सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे पोलिसांनी या गाडीविषयी खबर मिळाल्यानंतर पोलिसानी सापळा रचला होता. दरम्यान पुलावर उभे…

Read Full News

You cannot copy content of this page