वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

इतरांनी फुकटचे श्रेय घेऊ नये;सतीश सावंत यांचा विरोधकाना टोला

*💫कणकवली दि.०५-:* उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांच्या माध्यमातून जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या मागणीनुसार कणकवली तालुक्यातील वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्त करण्यात आले.जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत व जिल्हा सदस्या सौ. स्वरूपा विखाळे यांच्या हस्ते हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. यावेळी डॉ रूपाली वळंजू ,शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले,विभागप्रमुख अनुप वारंग, वरवडे सरपंच बांधल,कलमठ सरपंच वैदेही गुडेकर, बिडवाडी सरपंच सुदाम तेली,आशिये माझी सरपंच रश्मी बाणे,विलास गुडेकर, रामू विखाळे, राजू राठोड,कलमठ ग्रामपंचायत सदस्य विनायक मेस्त्री,शिवसेना अल्पसंख्याक तालुका प्रमुख निसार शेख, शाखा प्रमुख फ्रेंकि लोबो, धनंजय सावंत ,विजय कडुलकर, सुधीर सावंत,निर्गुण व शिवसेना कार्यकते उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले की, जि. प.सदस्य सौ. स्वरूपा विखाळे यांनी खास. विनायक राऊत यांच्याकडे केलेल्या मागणीनुसारच जिल्हा खनिकर्म विभाग यांच्यामार्फत पालकमंत्री उदय सामंत यांनी वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला शिवसेनेच्यावतीने ॲम्बुलन्स देण्यात आली. त्यामुळे इतरांनी फुकटचे श्रेय घेऊ नये असा टोला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी विरोधकांना लगावला आहे तसेच पुढील काळात आरोग्य विभागाला शासनाच्यावतीने जी मदत लागेल ती पुरवण्यात येणार असल्याचेही सतीश सावंत यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page