कोरोना लसिकरण बाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध करा

लोकांमध्ये आहे संभ्रम:भाजप मंडळ अध्यक्ष गोंदावळे यांची मागणी

*💫सावंतवाडी दि.०५-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सद्य स्थितीत लसीकरण केंद्रावर गोंधळ होत आहे. केंद्रावर १६० डोस आले असताना, किती ऑनलाईन दिले?, किती ऑफलाईन दिले?, किती सेंकड डोस दिले? याची माहिती दररोज मिळणे गरजेचे आहे. अशी मागणी भाजप सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे केली आहे. यावेळी त्यांनी सावंतवाडी शहरात वॉर्ड निहाय लसीकरण केंद्र सुरू करावे, शहरातील नागरिकांसाठी वेगळे लसीकरण केंद्र सुरू करावे, दर दिवशी किती लस ऑफलाईन, किती ऑनलाईन आणि दुसरा डोस किती हे बाहेर बोर्ड लावून प्रसिद्ध करावे, लसीकरणात सुसूत्रता आणण्यात यावी, सावंतवाडी बसस्थानकात लसीकरण करण्याची आवश्यकता असून, ती करण्यात यावी, ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यासाठी वेगळी सुविधा करण्यात यावी तसेच अंध आणि अपंग व्यक्तींना घरोघरीं जाऊन लस देण्यात यावी अशा मागण्या निवेदनातून भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केल्या आहेत.

यावेळी नगरपालिकेचे आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका दिपाली भालेकर, महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, दिलीप भालेकर, अमित परब, बंटी पुरोहित

You cannot copy content of this page