रोटरी क्लबचे डिजीइ व्यंकटेश देशपांडे यांचे मालवणच्या पदग्रहण सोहळ्यात प्रतिपादन
*💫मालवण दि.०५-:* रोटरी क्लब दरवर्षी निरनिराळी ब्रीद वाक्य घेऊन काम करीत असली तरी समाजाची सेवा करणे हा रोटरी क्लबचा मूळ हेतू कायम आहे दृष्टी, श्रद्धा, विश्वास, आशा आणि आत्मविश्वास या पाच गोष्टींवर रोटरी क्लबचे कार्य चालत असल्याने रोटरी सदस्यांनी आपली दृष्टी सकारात्मक ठेवून समाजात चांगल्या गोष्टी घडविण्यासाठी जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन रोटरी क्लबचे डिजीई व्यंकटेश देशपांडे यांनी रोटरी क्लब मालवणच्या ऑनलाईन पदग्रहण सोहळ्यात बोलताना केले. रोटरी क्लब मालवणच्या सन २०२१- २२ या वर्षासाठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्यानंतर या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा हॉटेल अनमोल येथे झूम ऍप द्वारे ऑनलाईन पद्धतीने रोटरीचे डिजीई व्यंकटेश देशपांडे यांच्या ऑनलाईन अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्यास असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ उपस्थित होते तर असिस्टंट गव्हर्नर शशिकांत चव्हाण हे ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी मालवणचे नूतन अध्यक्ष उमेश सांगोडकर यांच्यासह सचिव रतन पांगे, खजिनदार भाऊ साळगावकर यांना डिजी राजेश घाटवळ यांच्याहस्ते पदभार सोपविण्यात आला. तर क्लब सर्व्हिस- महादेव पाटकर, कम्युनिटी सर्व्हिस- डॉ. लीना लिमये, व्होकेशनल सर्व्हिस- अनिल देसाई, इंटरनॅशनल सर्व्हिस – डॉ. उल्हास मसुरकर, मेम्बरशिप सर्व्हिस – प्रदीप जोशी, फेलोशिप सर्व्हिस – अजय जोशी, युथ सर्व्हिस – अभय कदम, क्लब ऍडमिन प्रसन्नाकुमार मयेकर, रोटरी फाउंडेशन सर्व्हिस – डॉ. अजित लिमये, क्लब ट्रेनर – ऍड. हेमेन्द्र गोवेकर, पोलिओ डायरेक्टर – डॉ. अच्युत सोमवंशी, बुलेटिन सर्व्हिस- सौ. सुविधा तिनईकर, स्पोर्ट्स सर्व्हिस – मेघनाद धुरी यांना ऑनलाईन पद्धतीने पदभार देण्यात आला. यावेळी मावळते अध्यक्ष ऍड. हेमेन्द्र गोवेकर यांनी वर्षभरात रोटरी राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष उमेश सांगोडकर म्हणाले, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचाराने आपण रोटरी क्लबमध्ये प्रवेशकर्ते झालो. आज मालवण रोटरीचा अध्यक्ष म्हणून आपण जबाबदारी स्वीकारली ती आपण समर्थपणे पार पाडू. रोटरीची ध्येय धोरणे अमलात आणताना समाजासाठी काम करू असेही सांगोडकर म्हणाले. तर सचिव रतन पांगे यांनीही सर्वांच्या सोबतीने रोटरीच्या माध्यमातून समाजातील लोकांसाठी विविध उपक्रम राबवू असे सांगितले. यावेळी एजी राजेश घाटवळ यांनी रोटरीच्या दान या नव्या उपक्रमाची माहिती देत रोटरीकडे देणगीतुन जमलेल्या रक्कमेतून समाजातील गरजूना मदत करण्यात येईल असे सांगितले. यावेळी डिजी देशपांडे व एजी घाटवळ यांनी मालवण रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी सुविधा तीनईकर यांनी संपादित केलेल्या रोटरीच्या दर्पण या वार्षिकांकाचे ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याचे सुत्रसंचालन महादेव पाटकर यांनी केले. तर आभार सचिव रतन पांगे यांनी मानले. यावेळी बाळू तारी, डॉ. उल्हास मसुरकर, सुहास ओरसकर, प्रसन्ना मयेकर, गणेश नेरकर, संजय गावडे, लीना परांजपे, अमेय देसाई, विनय गावकर, श्री. वनकुद्रे, डॉ. आनंद पाटील, दिगंबर परुळेकर, प्रशांत कामत, अपूर्व फर्नांडिस आदी व इतर ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते

