Global Maharashtra Breaking News

मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका

नुकसान होण्याची भीती : हातातोंडाशी आलेला घास पाण्यात जाण्याची शक्यता *⚡बांदा ता.२९-:* नैसर्गिक संकटाच्या चक्रात नेहमी अडकणारा शेतकरी पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे संकटात सापडला आहे. पळींजचा धोका कायम असताना काही ठिकाणी उभी पिके आडवी झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पाण्यात जात असल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा सावंतवाडी तालुक्याला बसला….

Read More

बांदा गांधीचौकातील नवरात्रोत्सव नियम पाळूनच

विठ्ठल मंदिरात उत्सव नियोजनाची बैठक : सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन *⚡बांदा ता.२९-:* बांदा येथील गांधीचौक सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाची उत्सव नियोजनाची बैठक नुकतीच विठ्ठल मंदिरात मंडळाचे अध्यक्ष नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत या वर्षी कोरोनाचे सर्व नियम पळून कार्यक्रम करण्याचे ठरविण्यात आले. तर सामाजिक जाणिवा ठेऊन सार्वजनिक कामानाही अग्रक्रमाने करण्याचे ठरविण्यात आले. अध्यक्ष-सुनील…

Read More

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे 2 ऑक्टोंबरला लाक्षणिक उपोषण

*⚡सावंतवाडी ता.२९-:* ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २ ऑक्टोंबर गांधी जयंती दिनी जिल्हा परिषद येथे लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. हे आंदोलन सकाळी ११ वाजता सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन त्यानी जिल्हा परिषचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर यांनी दिली आहे.

Read More

श्रावण गवळीवाडीत सुनील घाडीगांवकर यांनी दिली पाण्याची टाकी

*⚡मालवण ता.२९-:* मालवण तालुक्यातील श्रावण गवळीवाडी या सुमारे दोनशे ते तीनशे लोकवस्ती असणाऱ्या वाडीला नळपाणी योजनेतून होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि त्यामुळे होणारी ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन मालवण पंचायत समितीचे गटनेते श्री. सुनील घाडीगांवकर यांनी या वाडीत स्वखर्चाने नळपाणी योजनेला पाच हजार लीटरची टाकी व टाकी ठेवण्यासाठी धक्का उभारून ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. काही…

Read More

बांद्यात फोटो स्टुडिओचे माकडाकडून नुकसान

वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी : मालकावरही धाऊन आल्याची घटना *⚡बांदा ता.२९-:* बांदा शहरात माकडांचा उच्छाद मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कट्टा कॉर्नर येथील सुजाता फोटो स्टुडिओत बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास एक माकड शिरून आरसा व इतर सामानाची तोडफोड केली. मालक अजित दळवी यांच्या अंगावरही माकड धावून आला, परंतु इतर दुकानदारांनी लगेच धाव घेतल्याने श्री. दळवी यांना…

Read More

समृध्द आनंदी गाव उपक्रमाला जिल्हा बँकेने सहकार्य करावे

देशातील सहकार शेत्र बंद करण्याचा उद्योग बंद झाला पाहीजे. :ब्रिगेडीयर सुधीर सावंत *⚡सिंधुदुर्गनगरी ता.२९-:* सहकार शेत्र बंद करण्याचा जो उद्योग देशात सुरू आहे तो बंद झाला पाहीजे.आम्ही समृध्द आनंदी गाव हा विषय घेउन पुढे जात आहोत त्याला जिल्हा बँकेने सहकार्य करावे.जिल्हा बँकेच्या माध्यमातून हा जिल्हा घडू शकतो.गावात रस्ते बांधून पाणी आणून काही होणार नाही. मुळ…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ३१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४९ हजार ४७१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार ५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यपाल यांच्या हस्ते सौ श्रध्दा दळवी यांचा राजभवन येथे सन्मान

*⚡सावंतवाडी ता.२९-:* भारत सरकारच्या युवा व खेल मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र संघटन, महाराष्ट्र व गोवा शाखेच्या वतीने विलवडे गावच्या स्नुशा सौ श्रध्दा दळवी यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगीरी बद्दल महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते नुकताच राजभवन येथे दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी “सन्मानचिन्ह व सन्मानपत्र” देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र…

Read More

कविवर्य आ.सो.शेवरे काव्य पुरस्कार कवी देवा झिंजाड यांना जाहीर

एस. के. फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन कोर्लेकर यांनी दिली माहिती *⚡कणकवली ता.२९-:* कोकणात परिवर्तन साहित्याला गती देणारे ज्येष्ठ कवी आ. सो. शेवरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्याच कोर्ले गावातील ‘एस. के. फाउंडेशन’तर्फे देण्यात येणाऱ्या काव्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. सदर पुरस्कार पुणे येथील कवी देवा झिंजाड यांच्या हार्मिन्स प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सर्व उलथवून टाकलं पाहिजे’ या…

Read More

भाजप सावंतवाडी शहर मंडल उपाध्यक्षपदी सत्यवान बांदेकर यांची नियुक्ती

*⚡सावंतवाडी ता.२९-:* भाजप सावंतवाडी शहर मंडल उपाध्यक्षपदी सत्यवान बांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी दिले आहे. सत्यवान बांदेकर यांची शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर नगराध्यक्ष संजू परब, भाजप पदाधिकारी , कार्यकर्ते यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Read More
You cannot copy content of this page