महाराष्ट्र दिन ,कामगार दिन आणि कूर्म जयंती निमित्त विशेष प्रयोग:समुद्री कासव संवर्धनावर आधारित विनोदी वन्यजीव नाटक :- प्रवेश विनामूल्य..
⚡वेंगुर्ले ता.३०-: येथे शुक्रवार दिनांक १ मे रोजी कांदळवन विभाग दक्षिण कोकण, वनपरिक्षेत्र कांदळवन मालवण आणि नगरपरिषद वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमानाने वन्यवाणी फाऊडेंशन निर्मित समुद्री कासव संवर्धनावर आधारित लोककलांच्या माध्यमातून रचलेले पहिले विनोदी वन्यजीव नाटक “संगीत कुर्माख्यान” हे नाटक नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह कॅम्प मार्ग वेंगुर्ला येथे सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आले आहे. संगीत कुर्माख्यान या नाटकाचा प्रयोग सर्व रसिक प्रेमीं आणि निसर्ग प्रेमी प्रेक्षकांसाठी विनामुल्य असून सर्व रसिक प्रेक्षकांनी या नाटकाचा उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
