बांदा गांधीचौकातील नवरात्रोत्सव नियम पाळूनच

विठ्ठल मंदिरात उत्सव नियोजनाची बैठक : सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन

*⚡बांदा ता.२९-:* बांदा येथील गांधीचौक सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाची उत्सव नियोजनाची बैठक नुकतीच विठ्ठल मंदिरात मंडळाचे अध्यक्ष नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत या वर्षी कोरोनाचे सर्व नियम पळून कार्यक्रम करण्याचे ठरविण्यात आले. तर सामाजिक जाणिवा ठेऊन सार्वजनिक कामानाही अग्रक्रमाने करण्याचे ठरविण्यात आले. अध्यक्ष-सुनील नाटेकर, सचिव-ओंकार नाडकर्णी यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या बैठीकीत भाऊ वाळके, प्रसाद वाळके, संदेश पावसकर, प्रशांत पांगम, दत्तप्रसाद पावसकर, राजदीप पावसकर, राकेश केसरकर, अमेय पावसकर, ज्ञानेश्वर येडवे, विवेक विरनोडकर, अनिल नाटेकर, सुनील वाळके, रोहन कुबडे आदी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला गेल्यावर्षीच्या कार्यक्रमाच्या रुपरेषेसह कार्यक्रमासाठी झालेल्या खर्चावर चर्चा विनिमय करण्यात आली. त्यानंतर आलेल्या सूचनांवर चर्चाकरून यावर्षीच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सूचना घेऊन नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. गेल्यावर्षी व यावर्षी कोरोनाचे जागतिक संकट लक्षात घेत व शासनाचे आदेश लक्षात घेत सर्व कार्यक्रम कोरोनाचे नियम काटेकोर पाळून उत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले. याबाबत अध्यक्ष सुनील नाटेकर याना विचारले असता शासनाचे नियम पाळूनच उत्सव साजरा होणार आहे. यासाठी भक्तगणानेही उत्सव काळात कोरोनाचे नियम पाळून उत्सवात सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन केले.

You cannot copy content of this page