नुकसान होण्याची भीती : हातातोंडाशी आलेला घास पाण्यात जाण्याची शक्यता
*⚡बांदा ता.२९-:* नैसर्गिक संकटाच्या चक्रात नेहमी अडकणारा शेतकरी पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे संकटात सापडला आहे. पळींजचा धोका कायम असताना काही ठिकाणी उभी पिके आडवी झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पाण्यात जात असल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा सावंतवाडी तालुक्याला बसला. काही ठिकाणी कापणीयोग्य झालेले परिपक्व उभे पीक आडवे झाले तर पाणथळ जमिनीत लहान पिकांना लोम्ब येण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे मुसळधार पावसामुळे पळींज होण्याचा धोका कायम आहे.
