समृध्द आनंदी गाव उपक्रमाला जिल्हा बँकेने सहकार्य करावे

देशातील सहकार शेत्र बंद करण्याचा उद्योग बंद झाला पाहीजे. :ब्रिगेडीयर सुधीर सावंत

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.२९-:* सहकार शेत्र बंद करण्याचा जो उद्योग देशात सुरू आहे तो बंद झाला पाहीजे.आम्ही समृध्द आनंदी गाव हा विषय घेउन पुढे जात आहोत त्याला जिल्हा बँकेने सहकार्य करावे.जिल्हा बँकेच्या माध्यमातून हा जिल्हा घडू शकतो.गावात रस्ते बांधून पाणी आणून काही होणार नाही. मुळ मुद्दा आहे तो रोजगाराचा व विकासाचा आहे.जिल्ह्यातील तरूण ज्या दिवशी कोकण सोडून बाहेर जाणार नाहीत त्या दिवशी जिल्ह्याचा विकास झाला असं म्हनू शकतो.असे प्रतिपादन जिल्हा बँक जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी ओरोस येथे केले. सहकारात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, पदाधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत दिले जाणा-या पुरस्कारांचे जिल्हाधिकारी के मंजूलश्मी यांच्या हस्ते बुधवारी ओरोस येथील शरदकृषी भवन सभागृहा मध्ये वितरण करण्यात आले. या सोहळ्यास बँकेचे अध्यश सतिश सावंत, ब्रिगेडीयर सुधीर सावंत जिल्हा बँक उपाध्यश सुरेश दळवी,सर्व संचालक मंडळ,बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी,पुरस्कार निवडसमिती सदस्य डॉ .प्रसाद देवधर,पत्रकार विजय शेट्टी,माजी जिल्हा बँक अध्यश राजन तेली,पुरस्कार प्राप्त मान्यवर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी संस्था, संस्था पदाधिकारी, सहकारातील कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा बँकेची ३८वी वार्षिक सरवसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्यावर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.सभेच्या शेवटी जिल्हा बँक अध्यश सतिश सावंत यांनी अध्यशीय भाषण केले.उपस्थित असलेल्या सभासदांच्या प्रश्नांना संपर्कपणे उत्तरे दिली.यावेळी बोलतांना ते म्हणाले बँकेच्या संचालक मंडळाने गेल्या साडेसहा वर्षात जे काही काम केलं ते सर्वांसाठी व बँकेसाठी केले. भविष्यात हि बँक या पेशाही चांगेल काम करत महाराष्र्टातच नव्हे तर देशात अग्रणी बँक बनेल.येणा-या निवडणूकीत कसलेही राजकारण न आणता जिल्ह्यातील सहकार वृध्दींगत होण्यासाठी काम केलं जाईल.बँक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.शेतकरी व सहकारी संस्था याच्या हितासाठी जे काही निर्णय घ्यावे लागतील ते कोण तेही राजकारण न आणता घेतले जातील.हि बँक सहकार शेत्रात महाराष्ट्रातच नव्हे तर नव्हे तर देशात अग्रेसर रहाण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील असा ठाम विश्वास शेवटी सतिश सावंत यांनी व्यक्त केला. कै.शिवराम भाऊ जाधव स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार सैनिक नागरी सह.पतसंस्था मर्या.सावंतवाडी यांनादेण्यात आला. कै.केशवरावजी राणे स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था पदाधिकारी पुरस्कार भालचंद्र केशव वारंग,अध्यश तुळसुलीविकास संस्था,तुळसुली यांना देण्यात आला. कै.डी.बी.ढोलम स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था कर्मचारी पुरस्कार श्री.कृष्णा दामोदर कर्ले,खारेपाटण विकास सोसायटी, खारेपाटण यांना देण्यात आला. कै.भाईसाहेब सावंत स्मृती प्रित्यर्थ कृषीमित्र पुरस्कार श्री राजाराम यश वंत मावळणकर यांना देण्यात आला तर कै बाळासाहेब सावंत स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांना जिल्हा धिकारी मंजूलश्मी याच्या हस्ते देण्यात आला.

You cannot copy content of this page