Global Maharashtra Breaking News

चिपी विमानतळाचे लोकार्पणाचे कणकवलीत होणार लाईव्ह प्रेक्षपण

आप्पासाहेब पटवर्धन चौकात शिवसेना मोठी स्क्रीन लावणार *⚡कणकवली ता.०८-:* चिपी-परुळे येथे उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाचे शनिवार 9 ऑक्टोबरला उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. याचे लोकार्पण मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळावर आयोजित केला आहे. हा ऐतिहासिक सोहळा कणकवलीवासीयांना पाहता यावा यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सकाळी ११.०० वाजता आप्पासाहेब पटवर्धन चौकात मोठी स्क्रीन लावून…

Read More

घटस्थापने निमित्त आंबेगाव श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचा शुभारंभ

*⚡सावंतवाडी ता.०८-:* श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिर आंबेगाव येथे नवरात्र घटस्थापना निमित्त ३० वे सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचा शुभारंभ आज करण्यात आला. ॲड. जनादर्न सामंत , कुणकेरीचे सुपुत्र नामदेव सावंत यांच्या हस्ते या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिराच्या जीर्णद्धारासाठी ॲड. जनादर्न सामंत यांनी एक लाख रुपयाची देणगी दिली. गावच्या…

Read More

दादा तुम्ही करून दाखवलेचा ‘विशाल’ बॅनर ठरतोय लक्षवेधी

भाजप युवा नेते विशाल परब यांनी चिपीत झळकवलेत बॅनर *⚡सावंतवाडी ता.०८ प्रसन्न गोंदावळे-:* सिंधुदुर्ग जिल्हावसियांचे विमानतळाचे स्वप्न येत्या ९ ऑक्टोंबर रोजी पूर्ण होत असून, चिपी विमानतळाचे शानदार उद्घाटन ९ ऑक्टोंबर केंद्र आणि राज्यातील मोठ्या मंत्र्यांच्या उपस्थित होणार आहे. याच पार्श्वभूमीवर “दादा तुम्ही करून दाखवल” हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचे बॅनर…

Read More

चंदन वाहतूक प्रकरणी कारवाई

चंदन मिळाले पण संशयित पळाला आंबोली चेकपोस्ट येथे मध्यरात्री झाली कारवाई *⚡आंबोली ता.०८-:* आंबोली चेकपोस्ट येथे चंदनाच्या झाडाच्या खोडाचे अंदाजे १५ ते २० किलो वजनाचे तुकडे वाहतूक करताना ताब्यात घेण्यात आले आहेत. परंतु, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत. सबंधित दुचाकी युवक पळून गेला आहे. ही कारवाई काल रात्री उशिरा ०१:४५ वाजता करण्यात आली आहे. याबाबत अधिक…

Read More

आरोस रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडुपे श्रमदानातून हटविली

सरपंच शंकर नाईक यांचा पुढाकार *⚡बांदा ता.०८-:* आरोस बाजार हायस्कूल ते आरोस तिठा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झुडपे वाढलेली हाेती. अनेक अपघात घडूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने सरपंच शंकर नाईक यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदानातून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे कापली. त्यामुळे अपघाताचा काहीसा धोका निदान सद्यस्थितीत तरी टळला आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोस गावामध्ये…

Read More

सावंतवाडी-पाडलोस मार्गे सातार्डा एसटी सुरू करा

महेश कुबल : एसटी अभावी विद्यार्थ्यांची गैरसोय *⚡बांदा ता.०८-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या असून त्यास विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद आहे. गेले दीड ते दोन वर्षांपासून शाळेपासून दूर असलेली मुले शाळेत जायला आतुरतेने बाहेर पडतात. परंतु सावंतवाडी-पाडलोस मार्गे सातार्डा या बंद असलेल्या एसटीअभावी त्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासनाने सदर एसटी तात्काळ…

Read More

विनू कुबल यांच्याकडून श्रावण शाळेतील विद्यार्थ्यांना अंडी वाटप

*⚡कणकवली ता.०८-:* मालवण तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय शाळा श्रावण नंबर 1 या शाळेमध्ये विविध कार्यकारी सोसायटी श्रावणचे चेअरमन विनू कुबल यांनी सर्व विद्यार्थ्यांना पोषक आहार म्हणून उकडलेली अंडी वाटप केली आहेत. अंड्यांचे वाटप करताना देणगीदार विनू कुबल, केंद्राचे केंद्रप्रमुख नितीन कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम परब, शाळेचे मुख्याध्यापक स्मिता किंजवडेकर, शिक्षक विनायक हरकुळकर, साक्षी…

Read More

स्ट्रीटलाईट कामाची नगराध्यक्षांकडून पाहणी

*⚡सावंतवाडी ता.०८-:* सावंतवाडी शहरात रस्त्यावर असणारे स्ट्रीट लाईट बदलण्यात येत असून, शहरात स्ट्रीट लाईट बदलण्याचे काम जोरदार सुरू आहे. आज या कामाची पाहणी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे. यावेळी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

Read More

राज्यस्तरीय घोषवाक्य व काव्य स्पर्धेत महक शेख हिचे सुयश

*⚡मालवण ता.०८-:* डॉट कॉम्स असोसिएशन, सिंधुदुर्ग मार्फत राज्यस्तरीय घोषवाक्य आणि स्वरचित काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये आमच्या मालवण येथील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीची विद्यार्थिनी महक इब्राहिम शेख हिने खुला गटातून घोषवाक्य स्पर्धेत प्रथम क्रमांक व स्वरचित काव्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करत नेत्रदीपक यश मिळविले आहे. या यशाबद्दल छोटेखानी कार्यक्रमात महक…

Read More

जाचक अटींमुळे विशेष प्रवर्गातील लाभार्थींना योजनांचा लाभ मिळत नाही

राष्ट्रवादीच्या गोविंद कदम, दीपक जाधव यांचे बीडीओना निवेदन *⚡दोडामार्ग ता.०८ सुमित दळवी-:* महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना या जिल्हा परिषद, पंचायत समिती, गावातील ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत असतात. यात मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती तसेच इतर लाभाच्या योजना राबविण्यात येतात, पण यासाठी असलेल्या जाचक अटीमुळे अनेक लाभार्थी याचा लाभ घेऊ शकत नाही, त्यामुळे या अटी शिथिल कराव्यात…

Read More
You cannot copy content of this page