ग्रामस्थ यांच्यासह वेंगुर्ला अग्निशमक बंब च्या साहाय्याने आग आटोक्यात..
⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला तालुक्यातील आरवली माहेर हॉटेल नजिक
सिद्धेश उर्फ मंदार प्रदीप रेगे यांच्या गॅरेजला गुरुवारी रात्री 8 ते 8.30 वा. च्या सुमारास आकस्मिक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीची माहिती मिळताच आरवली उपसरपंच किरण पालयेकर, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, भाऊ शिरोडकर, बाळा दाभोलकर, तुषार रगजी, भाऊ शिरोडकर, प्रवीण दळवी, बाळा साळगावकर, लतेश मोरे, शैलेश कांबळी तसेच अन्य आरवली, शिरोडा ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले. तसेच त्यानंतर सुमारे 8:45 वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ला अग्निशमक बंबाच्या सहाय्याने आग विझवण्यात आली. यामध्ये वेंगुर्ला न. प. कर्मचारी फायरमन नरेश परब, अजय जाधव, अमोल जाधव, देवेंद्र जाधव, पंकज पाटणकर, भाऊ कुबल यांनी आग आटोक्यात आणण्यात सहकार्य केले. या आगीबाबत वेंगुर्ला पंचायत समिती माजी उपसभापती सिद्धेश्वर उर्फ भाई परब यांनी वेंगुर्ला नगरपरिषदला माहिती दिली. या आगीत गॅरेजमधील स्पेअर पार्ट,ऑइल, कोम्प्रेसर जळून मोठे नुकसान झाले. तसेच काही दुचाकीनाही झळ बसली असून नुकसान झाले आहे. तसेच गॅरेजची दोन्ही भिंत पडून नुकसान झाली आहे. संबंधित व्यावसायिकाचे सुमारे सहा ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाला झाले असल्याच्या प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी वर्तविला आहे. दरम्यान आरवली तलाठी सतीश गावडे, कोतवाल संजय मेस्त्री यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तसेच शिरोडा पंचायत समिती सदस्य योगिता सिद्धेश परब, माजी उपसभापती सिद्धेश परब यांनीही घटनास्थळी भेट दिली.
