Headlines

Global Maharashtra Breaking News

आमदार दीपक केसरकर यांनी जिमखाना मैदान येथील क्रीडा संकुलाच्या कामाची केली पाहाणी…

⚡सावंतवाडी ता.०९-: माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी जिमखाना मैदान येथील क्रीडा संकुलाच्या कामाचा पाहाणी केली. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसलेंसह क्रीडा अधिकारी यावेळी उपस्थित होते. परिपूर्ण असं क्रीडा संकुल उभं करणारं असल्याचा विश्वास यावेळी श्री. केसरकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, परिपूर्ण असं क्रीडा संकुल उभ करत इन डोअरसह आऊट डोअर क्रीडा प्रकारही इथे उपलब्ध असणार…

Read Full News

माहीरा फाउंडेशन व शिवसेना तर्फे बांद्यात ११ मे रोजी महाआरोग्य मेळावा…

⚡बांदा, ता.०९-: : सर्वसामान्य नागरिकांना तज्ञ वैद्यकीय सेवा सुलभ दरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माहीरा फाउंडेशन आणि रियाज खान शिंदे शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ११ मे २०२६ रोजी बांदा येथे भव्य “महाआरोग्य मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हा मेळावा पार पडणार असून विविध आजारांवरील तपासणी, उपचार…

Read Full News

एसटीएस परीक्षेच्या इस्रो दौऱ्याचा कणकवलीत शुभारंभ…

⚡कणकवली ता.०९-:युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत यश प्राप्त केलेल्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 30 विद्यार्थी शनिवारी इस्रो येथे रवाना झाले. या इस्रो अभ्यास दौऱ्याचा शुभारंभ शनिवारी सकाळी युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सौ संजना सावंत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले. यावेळी संजना…

Read Full News

सावंतवाडीत १२ कोटींचे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारणार…

आमदार दीपक केसरकर यांची माहिती: विकासकामात राजकारण नको तर वायरल ऑडिओ मी ऐकलेला नसून त्याबद्दल बोलणं उचित नाही.. सावंतवाडी : सावंतवाडी शहरासाठी ५ कोटी खर्च करुन क्रीडा संकुल मंजूर झालं असून नवीन काही खेळाच्या सुविधा तिथे उपलब्ध होणार आहे. इन डोअरसह आऊट डोअर खेळही तिथे उपलब्ध होणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी…

Read Full News

सिंधुदुर्गनगरी येथेअस्सल गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ…

प्राधिकरण क्षेत्राला मिळाली हक्काची बाजारपेठ; शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीला चालना:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रतिपादन.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०९-:सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून येथे वास्तव्यास असलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांसाठी स्थानिक स्तरावर दर्जेदार आणि विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध होणे काळाची गरज होती. ओरोस एस.टी. स्टँड परिसरात सुरू करण्यात आलेल्या “अस्सल गावठी आठवडा बाजारामुळे” आता प्राधिकरण क्षेत्राला स्वतःची…

Read Full News

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात…

नांदगाव ब्रिजवर आर्टिगा कारचा अपघात:आईचा मृत्यू, वडील व मुलगी गंभीर जखमी.. ⚡कणकवली ता.०९-: मुंबई – गोवा महामार्गावरील नांदगाव ब्रिज येथे आज सकाळी ९:३० वा.च्या सुमारास आर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचे पती व मुलगी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई येथून हिर्लोक, कुडाळच्या दिशेने जात असताना…

Read Full News

वालावल ते कवठी रस्त्याची झालेली दुर्दशा…

१२ मे रोजी वालावल येथे रास्ता रोको:प.स. सदस्य अर्चना बंगे यांचा इशारा.. कुडाळ : वालावल ते कवठी पर्यंत रस्त्याची झालेली दुर्दशा, लोक व वाहानधारकांचे होणारे हाल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत; या बाबत लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि. १२ मे रोजी सकाळी ९ वाजता वालावल येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ व…

Read Full News

एस. पी .एस फार्मसी कॉलेजचे घवघवीत यश…

कुडाळ : श्री.पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी,डिगस येथील विद्यार्थ्यांनी SWAYAM NPETL अंतर्गत घेण्यात आलेल्या research methodology व health research fundamentals या अभ्यासक्रमाच्या परिक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परिक्षेत महाविद्यालयाचे एकूण ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या यशा मागे NPTEL समन्वयक प्रतीक तेर्से यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थाध्यक्ष भुपतसेन सावंत, परिसर संचालिका सौ.नुतन परब व…

Read Full News

देवबागच्या समुद्रात बुडणाऱ्या नऊ वर्षाच्या मुलाला वाचविणाऱ्या मच्छिमाराचा मृत्यू…

⚡मालवण ता.०९-:देवबाग सिद्धेश्वर मंदिरासमोरील समुद्रात समुद्र स्नानाचा आनंद लुटत असताना समुद्राच्या पाण्याला आलेल्या भरतीचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडणाऱ्या दर्श दत्तात्रय चोपडेकर या नऊ वर्षीय मुलाला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाचविणाऱ्या रावजी उर्फ काका अवधूत चोपडेकर (वय ५८, रा. देवबाग चोपडेकरवाडी) यांचा श्वसननलिकेत समुद्राचे पाणी गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी सव्वा बारा…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡कणकवली ता.०८-:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

Read Full News

You cannot copy content of this page