Headlines

Global Maharashtra Breaking News

एकता पॅनेलला कुडाळ एमआयडिसी.इंडस्ट्रीज असोसिएशनचा पाठींबा…

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची निवडणूक:अध्यक्ष मोहन होडवडेकर यांनी केले स्पष्ट.. ⚡कुडाळ ता.०४-: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चर या उद्योग क्षेञातील शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या चेंबरची द्विवार्षिक निवडणूक येत्या ११ जून रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ एमआयडिसी.इंडस्ट्रीज असोसिएशनने एकता पॅनेलला आपला पाठिंबा दिला असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडवडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे…

Read Full News

आडेली आंबेडकरनगर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यास ग्रामपंचायतमार्फत उपाययोजना करण्यात येईल : सौ. यशस्वी कोंडसकर…

⚡वेंगुर्ला ता.०३-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली आंबेडकरनगर येथे जुन्या सार्वजनिक विहिरीत पाणी उपलब्धता आहे. सद्या पावसाळा हंगाम सुरु न झाल्याने व पाण्याची खोली खाली गेल्याने नळपाणी योजना बंद आहे. तरी जुन्या विहिरीवरून रहाटाद्वारे पाणी नागरिकांना उपलब्ध होत आहे. दरम्यान येथील वाडीतील दुसऱ्या सार्वजनिक विहिरीचे शासनामार्फत उर्वरित काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू…

Read Full News

भाजपच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण सोहळा…

⚡सावंतवाडी ता.०३-: पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने आगामी ५ जून २०२६ रोजी ‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून एका भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वोदयनगर येथे सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. या वृक्षारोपण मोहिमेस मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रमोद…

Read Full News

सावंतवाडीत हॉटेल चोरीचा प्रयत्न उधळला…

एसी कॉम्प्रेसर’सह दोघांना पोलिसांनी पकडले… ⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडीतील एका हॉटेला चोरांनी लक्ष केलं असून. येथील वस्तू चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. काल रात्रीची गस्त घालत असताना पोलीस पथकाने आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका संशयास्पद वाहनाला पकडून मोठी कारवाई केली. संशयास्पदरीत्या ‘एसी कॉम्प्रेसर’ घेऊन जाणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी रंगेहात पकडले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात…

Read Full News

बेकायदा माती उत्खनन प्रकरण पुन्हा चर्चेत…

५.९१ कोटींचा दंड वसूल करण्याची मागणी ; विलास साळसकर यांचे तहसीलदारांना निवेदन.. ⚡देवगड ता.०३-: देवगड तालुक्यातील बेकायदा गौण खनिज (माती) उत्खनन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, या प्रकरणात आकारण्यात आलेली तब्बल ५ कोटी ९१ लाख १२ हजार ६०० रुपयांची दंडात्मक रक्कम तातडीने वसूल करावी, अशी मागणी तालुकाप्रमुख विलास मधुकर साळसकर यांनी तहसीलदार, देवगड यांच्याकडे…

Read Full News

कुडाळमध्ये ‘जागतिक सायकल दिन’ उत्साहात…

सायकल रॅलीतून दिला आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश.. कुडाळ : युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या ‘माय भारत’ (MY Bharat) उपक्रम आणि ‘इंस्पायर सायकल्स ‘ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सायकल दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. निरोगी जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कुडाळकरांनी या उपक्रमात भरभरून सहभाग नोंदवला.​या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. जयसिंग…

Read Full News

कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी विशेष पथक गठीत…

मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे आदेश:नगर रचनाकार अक्षता रोळे यांच्याकडे पथकाची जबाबदारी.. ⚡कणकवली ता.०३-: कणकवली नगरपंचायतीकडून शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी विशेष अतिक्रमण हटाव पथक गठीत करण्यात आले आहे. नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी याबाबत आदेश जारी केले असून नगर रचनाकार अक्षता रोळे यांची पथकाच्या पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात सहाय्यक म्हणून एकूण…

Read Full News

मालवणात पहाटे बेवारस स्थितीत सापडला दीड वर्षाचा मुलगा…

तपासाअंती मुलगा त्याच्या पालकांच्या स्वाधीन.. ⚡मालवण ता.०३-:मालवण येथील भरड परिसरात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना सुमारे दीड वर्षांचा एक चिमुकला मुलगा कुत्र्यांच्या गराड्यात एकटाच फिरताना सापडून आल्याने मालवणात एकच खळबळ उडाली. याबाबत मालवण पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी या बालकाला मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करत बालकाच्या पालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यामध्ये मालवणवासियांनीही आपापल्या…

Read Full News

ओटवणे अपघातातील गंभीर जखमी सीमा तळवडेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू…

⚡सावंतवाडी ता.०३-: ओटवणे येथे महिंद्रा पिकअप आणि प्लेझर दुचाकी यांच्यात मंगळवारी दुपारी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सरमळे कुंभारवाडी येथील सौ सीमा सचिन तळवडेकर (वय ४२) यांचे बुधवारी पहाटे गोवा बांबोळी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या आकस्मित अपघाती निधनाने तळवडेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अकाली आकस्मित निधनाचे वृत्त समजताच सरमळेवासीयांनाही धक्का बसला आहे. सरमळे…

Read Full News

विद्युत खांबावर काम करताना महावितरण कर्मचाऱ्याला शॉक…

⚡सावंतवाडी ता.०३-: तालुक्यातील कारिवडे येथे एका विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना महावितरणच्या कर्मचाऱ्याला विजेचा तीव्र धक्का लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शॉक लागल्यामुळे हा कर्मचारी थेट जमिनीवर कोसळला. प्रज्योत नाईक असे या जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. सुदैवाने या गंभीर प्रसंगातून ते बालंबाल बचावले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्रज्योत…

Read Full News

You cannot copy content of this page