जिल्हा क्रिकेटच्या प्रथमेश गावडे याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संघात निवड
सावंतवाडी,ता.०४: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या विनू मंकड क्रिकेट स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू व जलदगती गोलंदाज प्रथमेश पुंडलिक गावडे याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा ७ ऑक्टोबरपासून गुडगाव-हरियाणा येथे होणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील आंबोली सतीचीवाडी येथील रहिवासी असलेल्या प्रथमेशने आपल्या अप्रतिम गोलंदाजीने निवड समितीचे लक्ष…
