Headlines

Global Maharashtra Breaking News

शिष्यवृत्ती परीक्षेत टोपीवाला हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

⚡मालवण ता.१२-: मालवण येथील मालवण एज्युकेशन सोसायटी संचलित अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले आहे. इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत एक तर आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत नऊ अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. यात कैवल्य सागर मिसाळ याने ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दहावा व सिंधुदुर्ग…

Read More

मालवणच्या टोपीवाला हायस्कुलच्या स्नेहसंमेलनात ‘वनराई’चे नेपथ्य ठरले आकर्षण

⚡मालवण ता.१२-: मालवण येथील टोपीवाला हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात यावर्षी पर्यावरण पूरक नेपथ्य साकारण्यात आले. शाळेचे कलाशिक्षक बी. जी. सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या नेपथ्यात रंगभूमीवर हिरव्या वनराईचे चित्र रेखाटत ‘झाडा लावा झाडे जगवा’ असा संदेश नेपथ्याच्या माध्यमातून हटके देण्यात आल्याने तो एक कौतुकाचा विषय बनला मालवण येथील टोपीवाला हायस्कुलचे स्नेहसंमेलन मामा वरेरकर…

Read More

कोकण विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे घवघवीत यश

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१२-: संचालनालय लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समितीतर्फे आयोजित कोकण विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने चॅम्पियनशिप चषकासह वैयक्तिक क्रींडा प्रकारात ८ सुवर्ण पदके, ६ रजत पदके व १ कांस्य पदकाची कमाई केली. सांघिक क्रीडा प्रकारात क्रिकेट व हॉलीबॉल (शुटींग) यामध्ये विजेतेपद पटकावून घवघवीत यश संपादन केले. तसेच सिंधुदुर्ग संघाने संचलनामध्ये प्रथम क्रमांकाचे…

Read More

“मकर संक्रांती भोगी” सणाचा दिवस “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून साजरा करावा

कृषि संचालक विकास पाटील ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१२-: आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत “मकर संक्रांती भोगी” हा सणाचा दिवस राज्यामध्ये “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन कृषि आयुक्तालयाचे संचालक विस्तार व प्रशिक्षण विकास पाटील यांनी केले आहे.मकर संक्रांतीचा औचित्य साधून प्रत्येक कृषि सहाय्यकांनी आपल्याकडील गावामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य…

Read More

राज्यस्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेचे मंगळवारी उद्घाटन

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१२-: राज्यस्तरीय शालेय बुध्दीबळ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता मामाचो गाव रिसॉर्ट हिर्लोक येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे.यावेळी प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्ररिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, कोल्हापूर विभागाचे क्रीडा…

Read More

आपदा मित्र’ व्दितीय तुकडी प्रशिक्षणाचे शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१२-: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने शुक्रवार दि. १३ जानेवारी रोजी कुडाळ येथील आर एस एन हॉटेल येथे ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी ३.३० जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली.जिल्ह्यात आपदा…

Read More

कोलझरच्या समाजसेवा हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न

⚡बांदा ता.१२-: कोलझर येथील समाजसेवा हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. कोलझर सरपंच सौ. सुजल गवस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व देवी सरस्वतीचे पूजन करण्यात आले.     यावेळी समन्वय समिती उपसचिव नंदकुमार नाईक, समाजसेवा मंडळ अध्यक्ष पी. पी. देसाई, निवृत्त मुख्याध्यापक दशरथ घाडी, तळकट सरपंच सुरेंद्र सावंत, कुंब्रल सरपंच जनार्दन गोरे, शालेय समिती सदस्य आपा…

Read More

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणार

खनिकर्म व बंदरे विकास मंत्रीना.दादासाहेब भुसे यांची ग्वाही ⚡कणकवली ता.१२-: राज्याचे खनिकर्म व बंदरे विकास मंत्री ना.दादासाहेब भुसे यांची जंजिरा या निवासस्थानीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनीबाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या नेतृत्वाखाली भेट घेत विजयदुर्ग बंदर विकास व अवैध वाळू विकास यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना नेते ब्रिगे.सुधीर सावंत यांच्या समवेत उपजिल्हाप्रमुख…

Read More

कणकवली सार्व.बांधकाम विभागात राजमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद यांची जयंती

⚡कणकवली ता.१२-: सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीच्या कार्यालयात राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी उप कार्यकारी अभियंता के.के.प्रभू, लेखापाल विजेंदर सिंग, अभियंता वर्षाराणी सूर्यवंशी, अभियंता संजीवनी थोरात, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व अभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रथम राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या…

Read More

शाळा सुटली:१५ मिनिटे वाहनांना ब्रेक

बांदा बाजारपेठ जिल्हा परिषद शाळेच्या पालकांनी लावला फलक बांदा/प्रतिनिधीबांदा बाजारपेठेत असलेल्या जिल्हा परिषद केंद्रशाळेची पटसंख्या ३०० हून अधिक असल्याने सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेत चारचाकी वाहनांना १५ मिनिटे प्रवेश बंदी करण्यासाठी पालकांनी पुढाकार घेत मार्गदर्शक फलक उभारला. यावेळी पालक व व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याठिकाणी स्वतः थांबून वाहतूक थांबविली. शाळेतील विद्यार्थी मार्गस्थ झाल्यानंतरच वाहनांना प्रवेश देण्यात आला.जिल्हा…

Read More
You cannot copy content of this page