व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम प्रशासलेच्या वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न…

बांदा/प्रतिनिधी
श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या मडुरा येथील व्ही एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर बांदा नाबर प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, उद्योजक शंकर वळंजु, नारायण पित्रे, भिकाजी धुरी, घनश्याम वालावलकर, हेलेन रोड्रिक्स, कामत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मंगेश कामत आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्यध्यापिका सौ प्रतीक्षा शिरोडकर यांनी केले. यावेळी वर्षभरात प्रशालेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांची बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेबाबत चांगला विचार आणि उत्तर उत्तर प्रगती व्हावी असे आशीर्वाद दिले. यावेळी सहशिक्षिका सौ. वेलांकनी रोड्रिक्स, तेजस्वी गावडे, प्राची परब उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ वेलांकनी रॉड्रिग्ज यांनी केले तर आभार तेजस्वी गावडे यांनी मानले.
फोटो :-
मडुरा नाबर प्रशाळेच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे दीपप्रज्वलन करून उदघाटन करताना ट्रस्टचे अध्यक्ष मंगेश कामत. सोबत भाऊ वळंजू, शशिकांत पित्रे, प्रतीक्षा शिरोडकर व इतर.

You cannot copy content of this page