सावंतवाडीतील करवाढ रद्द करण्याबात मंत्री केसरकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र…

जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्याची केली मागणी,

सावंतवाडी
येथील नगरपालिका प्रशासनाकडून शहरातील पाणीपट्टी, घरपट्टी आणि इतर करामध्ये केलेल्या वाढीस स्थगिती देण्यास यावी याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात यावेत अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे, तर करवाढ रद्द करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी प्रशासक तथा प्रांताधिकारी यांची बैठक मुंबई येथे आयोजित करून त्या बैठकीला आपणास आमंत्रित करावे अशी मागणीही मंत्री केसरकर यांनी केली आहे.


सावंतवाडी शहरात पाणीपट्टी घरपट्टी कर वाढीचा प्रश्न पेटला असतांना मंत्री केसरकर यांनी यावरचे पत्र मुख्यमंत्र्यांना सादर केले असून सदरचे पत्र त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे सावंतवाडी नगरपालिकेवर प्रशासक राज असताना कोणत्याही नागरिकांना विश्वासात न घेता प्रशासनाकडून घरपट्टी मध्ये मातीच्या घरांना 25 रुपयांवरून थेट चारशे रुपये इतकी वाढ केली आहे तर पाणीपट्टीमध्ये प्रति युनिट तीन रुपये इतकी वाढ केली आहे हे वाढ नागरिकांच्या दृष्टीने अन्यायकारक असल्याने शहरात गेल्या आठवड्याभरात विविध पक्षाकडून या विरोधात आवाज उठवण्यात आला आहे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रथमता याबाबत आवाज उठवून घरपट्टी पाणीपट्टी दरवाढ पेटवणार असल्याचे म्हटले होते त्यानंतर भाजपकडून जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्यासह जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे ठाकरे शिवसेनेकडून सुद्धा यासंदर्भात मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधण्यात आले होते तर त्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून सर्व पक्षी यांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याबाबत निर्णय घेतला आहे.
घरपट्टी पाणीपट्टी दरवाढीबाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरत असतानाच यात आता मंत्री केसरकर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधून त्यांना ही दरवाढ मागे घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यासंदर्भात पत्र दिले आहे त्यामुळे पाणी पट्टी आणि घरपट्टी दरवाढ थेट मंत्रालयापर्यंत पोचली आहे. श्री केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामध्ये पाणीपट्टी घरपट्टी दरवाढ रद्द करण्यासंदर्भात मुंबई येथे जिल्हाधिकारी प्रांताधिकारी आणि मुख्याधिकारी यांची बैठक आयोजित करून त्या बैठकीला आपणास आमंत्रित करावे असे म्हटले आहे.

You cannot copy content of this page