नाट्यगीत गायन स्पर्धेत गौरी वस्त, तेजल गावडे, आस्था आचरेकर प्रथम

⚡मालवण ता.०५-: मालवण येथील अष्टपैलू कलानिकेतन तर्फे नाटककार कै. राम गणेश गडकरी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित सवेश साभिनय नाट्यगीत स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत बालगटामध्ये गौरी राजन वस्त हिने, कुमार गटात तेजल रवींद्र गावडे हिने तर खुल्या गटात आस्था राजेंद्र आचरेकर हिने प्रथम क्रमांक पटकविला.

मालवण भरड येथील दत्त मंदिर येथे हि स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत बाल, कुमार व खुला अशा तिन्ही गटात मिळून ३१ स्पर्धकांनी सहभाग घेत विविध गाजलेली नाट्यगीते सादर केली. स्पर्धेचे परीक्षण गोवा येथील संजय धूपकर व केशव पणशीकर यांनी केले. यावेळी स्पर्धेस नाट्य व संगीत रसिकांनी उपस्थिती दर्शवून स्पर्धकांच्या सादरीकरणाची वाहवा केली.

स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे- बाल गट – द्वितीय – मंजिरी प्रशांत गोवेकर, तृतीय – गार्गी राजन पराडकर, उत्तेजनार्थ – दुर्वा नंदकिशोर राणे, मनवा विशाल केळुसकर, प्रोत्साहनपर – श्लोक निलेश सामंत, प्रतीक्षा भालचंद्र मणचेकर. कुमार गट – द्वितीय – प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई, तृतीय – कनक दीनानाथ काळोजी, उत्तेजनार्थ – मृण्मयी सदाशिव आरोलकर, भूमी आशिष नाबर, खुला गट – द्वितीय – निधी श्रीकांत जोशी, तृतीय – सौ. श्वेता विजय यादव, उत्तेजनार्थ – चैताली राजेंद्र मेस्त्री, अंकिता अरुण परुळेकर. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी अष्टपैलू कलानिकेतनचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर, सचिव सुधीर कुर्ले, किरण वाळके, सतीश शेजवलकर आदी उपस्थित होते.

नाट्यगीत सादरीकरणासाठी संगीत साथ भालचंद्र केळुसकर, मंगेश कदम, सुधीर गोसावी यांची लाभली. सूत्रसंचालन विनोद सातार्डेकर यांनी केले. स्पर्धेसाठी सुनील परुळेकर, निलेश गवंडी, अभय कदम, बाळा आचरेकर, हेमंत आचरेकर, कुणाल वराडकर, रत्नाकर सामंत, प्रथमेश सामंत, बाळू काजरेकर, भाई मेस्त्री, संतोष मयेकर, विलास देऊलकर, चिन्मय गवंडी, भूषण काजरेकर, गरिमा काजरेकर, गौरीश काजरेकर, सुशांत पवार, सुहास माळकर, भाऊ सामंत आदी व इतरांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page