Headlines

वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा संकल्प; संतोष बोडके यांच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡वैभववाडी ता.३१-: वाढदिवस म्हटला की उत्सव, शुभेच्छा आणि आनंदाचा सोहळा डोळ्यांसमोर येतो. मात्र, आपल्या वाढदिवसाचा आनंद समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याची प्रेरणादायी परंपरा वैभववाडी तालुक्याचे युवा कार्यकर्ते धनगर समाज भवन समितीचे सचिव संतोष बोडके यांनी वाढदिवसानिमित्त जय मल्हार दुर्गोबा मंडळ अचिर्णे भाऊ भैयाजी गोरे ट्रस्ट,मित्रपरिवार, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल 25 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
​रक्तदान शिबिराचे उद्घाटन वैभववाडी तालुक्याचे माजी गटविकास अधिकारी आर डी जंगले व माजी पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तादानाचे महत्त्व अधोरेखित करत संतोष बोडके यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णांना जीवनदान देणाऱ्या रक्तादानासारख्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करणे ही समाजाप्रती असलेली जाणीव आणि बांधिलकी दर्शविणारी बाब असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
​रक्तदानासाठी नागरिक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे खाऊ वाटप करण्यात आले व संतोष बोडके यांनी स्वखर्चाने वैभववाडी तालुक्यात प्रथमच पहिली रुग्णवाहिका सेवा देण्याची काम हाती घेतले आहे अशा उपक्रमांमधून समाजात दातृत्वाची व तरुण नेतृत्वाची गरज असल्याचे मान्यवरील सांगितले.
​यावेळी भवन समिती अध्यक्ष कानू शेळके पांडुरंग काळे विजय खरात पोलीस पाटील जानकर अचिर्णे गावचे माजी सरपंच महेश रावराणे रक्त मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू पडवळ धुळाजी काळे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ पोटे डॉ मोरे अरुण गावचे पोलीस पाटील सूर्यकांत बोडके नापणे गावचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत बोडेकर अल्पेश यादव रत्नमोल निकम दिवेश गजोबार नागेश बोडके आदी कार्यकर्ते मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page