गायत्री येनगे ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत ओबीसी प्रवर्गात राज्यात प्रथम
सातारा सैनिक स्कूलमध्ये मिळाला प्रवेश;जिल्हा परिषद कोकिसरे बांबरवाडी शाळेची विद्यार्थिनी वैभववाडी संजय शेळकेजि. प. कोकिसरे बांबरवाडी शाळेची विद्यार्थिनी गायत्री अमोल येनगे हिने नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत ओबीसी प्रवर्गात राज्यात प्रथम क्रमांक मिळवून सैनिक स्कूल,सातारा येथे आपला प्रवेश निश्चित केला आहे.तिच्या या सुयशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
