पालकमंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या सेवेचा लाभ घ्यावा;बांदा भाजप अध्यक्ष बाबा काणेकर यांचे आवाहन
बांदा/प्रतिनिधी
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लोकार्पण केलेले टेलिमेडिसिन निदान व उपचार सुविधा केंद्र स्पर्श हॉस्पिटल पुणे यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे. या सुविधा केंद्राचा रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन भाजपचे बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी केले आहे.
या सुविधा केंद्रात ग्रामीण भागातील जनतेला स्पर्श हॉस्पिटलमधील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला व तात्काळ मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत. प्रसूती तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ व इतर आवश्यक तपासणी व उपचार पद्धती याठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रुग्णांना या माध्यमातून शहरातील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला देखील ऑनलाईन मिळणार आहे.
बांदा आरोग्य केंद्रात रुग्णांची ओपिडी ही सर्वाधिक असून रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री काणेकर यांनी केले आहे.
