वाफोली येथील महिला आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद
ग्रामपंचायत आणि घे भरारी महासंघ यांचे आयोजन बांदा/प्रतिनिधीवाफोली ग्रामपंचायत व घे भरारी ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.वाफोली येथील सोसायटी सभागृहात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून…
