पाडलोस अपघातात तळवणेतील तरुण जखमी
एसटी बस व दुचाकीत अपघात : अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविले ⚡बांदा ता.२८-: पाडलोस येथे कालवा पुलाजवळ आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास वेंगुर्ले-पाडलोस-बांदा एसटी व दुचाकीत भीषण अपघात झाला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून दुचाकी उसळली व एसटीला आदळली असे स्थानिकांनी सांगितले. अपघातात दुचकीस्वार सावळाराम सूर्यकांत घाटये (वय 36, रा. तळवणे) याच्या उजव्या पायाला…
