Headlines

Global Maharashtra Breaking News

पाट हायस्कूल मध्ये सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन

कुडाळ : पाट हायस्कुल मध्ये निवती पोलीस स्टेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.याकरिता विविध एप्लीकेशन, त्याचप्रमाणे इंटरनेटवरून प्राप्त होणाऱ्या लिंक, सायबर क्राईम, येणारे मेसेजेस त्याचप्रमाणे पैशांचा फ्रॉड याबाबत मुलांना माहिती देण्यात आली. याकरिता निवती पोलीस स्टेशनचे हवालदार शामराव कांबळे आणि मारुती कांदळगावकर यांच्यासोबत आय.टी कॉम्प्युटरचे संचालक अमृत…

Read Full News

आजगांव पंचक्रोशीत भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या तर्फे शालेय साहित्य वाटपाचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.०३-: शिक्षणाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या तर्फे आजगांव पंचक्रोशीत शालेय साहित्य वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात आजगांव जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून करण्यात आली. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या शिक्षणाला बळ मिळावे, या…

Read Full News

चित्रकार श्रीराज बादेकर यांच्याकडून आईच्या वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थांचे तैलचित्र मठाला भेट…

⚡मालवण ता.०३-:मालवण मधील चित्रकार श्रीराज बादेकर यांनी कॅनव्हासवर तैलरंगातून साकारलेले श्री स्वामी समर्थ यांचे आकर्षक चित्र आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त साळेल येथील स्वामींच्या मठाला भेट म्हणून अर्पण केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. मालवण मधील बादेकर कुटुंबाला कलेचा उज्ज्वल व समृद्ध असा वारसा लाभला आहे. या कुटुंबातील प्रसिद्ध निसर्गचित्रकार श्रीधर बादेकर यांचे श्रीराज बादेकर हे…

Read Full News

पुजारेवाडी युवकांकडून श्रमदानातून अंतर्गत रस्त्याची सफाई…

⚡मालवण ता.०३-:आचरा बाजारपेठ ते आचरा तिठा कावळे दुकानाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पुजारेवाडी येथील युवकांनी श्रमदानातून स्वच्छता करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.आठवडा बाजार तसेच इतर दिवशी बाजारपेठ, देवूळवाडी आणि परिसरातील नागरिक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा झाडे, झुडपे आणि वेली वाढल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना…

Read Full News

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने 220 मरणोत्तर देहदान…

⚡सावंतवाडी ता.०३-: जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने दि.३ जुलै २०२६ रोजी देवबाग,ता.मालवण येथिल श्रीम.मनिषा मधुसुदन तांडेल हीचे मरणोत्तर देहदान शासकीय मेडीकल काँलेज सिंधुदूर्ग येथे करण्यात आले.त्यावेळी त्यांचे पती श्री.मधुसुदन भिसाजी तांडेल,दिर-श्री.रमाकांत भिसाजी तांडेल व कुटुंबिय ऊपस्थित होते.आजपर्यंत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने २१९ मरणोत्तर देहदान व १८२ अवयव दान करण्यात आलेले आहे.देहदान प्रक्रियेच्या वेळी वैद्यकीय…

Read Full News

सोळाव्या वित्त आयोगामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासनिधीत होणार वाढ-:हर्षदा वाळके…

⚡ओरोस ता ३-: सोळावा वित्त आयोग सुरू करताना केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला आपल्या राज्य वित्त आयोगातून स्थानिक स्वराज्य संस्था निधी देण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे पुढील काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती यांच्या विकासनिधीत वाढ होणार आहे, अशी माहिती कणकवली सभापती हर्षदा वाळके यांनी जिल्हा परिषद सदस्यांसाठी आयोजित पंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षक…

Read Full News

शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास हाच यशाचा राजमार्ग…

*जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांचे प्रतिपादन:कलंबिस्त इंग्लिश स्कूलमध्ये ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.०३-:कोणतेही यश मिळवायचे झाले तर प्रामाणिकपणा आणि मेहनत अधिक महत्त्वाची असते. आज तुम्ही ज्या वर्गात बसला आहात, त्याच वर्गात कधीकाळी मीही बसलो होतो. म्हणून मी खात्रीने सांगतो. तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थी मोठे यश मिळवू शकतो. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, मोठी…

Read Full News

पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; ऑनलाईन नोंदणी सुरू…

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे शासकीय स्क्रूटनी सेंटर… ⚡सावंतवाडी ता.०३-: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष चार वर्षीय पदवी अभियांत्रिकी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या वर्षी विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी ‘ई-स्क्रूटनी’ आणि ‘फिजिकल…

Read Full News

विकास आराखडा हरकत मुदत एक महिन्याने वाढवून द्या…

न. प. च्या विशेष सभेत आग्रही मागणी :वाढीव रुंदीचे रस्ते, गायब झालेले ओहोळ, पूररेषा हे डीपी प्लानचे कळीचे मुद्दे.. कुडाळ : शहराच्या विकास आराखड्यात २७ ठिकाणी आरक्षण दाखवण्यात आली आहेत आणि त्यासाठी तब्बल २५६ हरकती नगर पंचायतीकडे आलेल्या आहेत. आरक्षणात दाखवण्यात आलेले रस्ते, नसलेले ओहोळ, ग्रीन झोन, पूररेषा याबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. हीच लोकांमधील नाराजी…

Read Full News

तेंडोली-वरची आदोसवाडी येथे उद्या संयुक्त दशावतार

कुडाळ : तेंडोली-वरची आदोसवाडी येथे रामचंद्र राऊळ मित्रमंडळाच्यावतीने 4 जुलै रोजी रात्री 7.30 वाजता तेथीलच कुलस्वामिनी मंदिरात “शिव अजमीढ संग्राम अथार्त अजमीढ शरसेतू” हे संयुक्त दशावतार नाटक आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नावाजलेल्या कलाकारांचा या नाटकात समावेश आहे.या नाटकातील कलाकार गणपती – प्रथमेश मेस्त्री, रिध्दी सिध्दी-सखाराम परब, शंकर-प्रशांत मयेकर, नारद- चारुहास मांजरेकर, राजा नल-मोरेश्वर सावंत,…

Read Full News

You cannot copy content of this page