निबंध स्पर्धेत उभादांडा इंग्लिश स्कूलचे यश
⚡वेंगुर्ला ता.०७-: भारतीय बौद्ध महासभेच्या सिधुदुर्ग शाखेच्यावतीने शालेय मुलांना व्यासपिठ देण्यासाठी ६७व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून घेतलेल्या ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान‘ यावर घेतलेल्या निबंध स्पर्धेत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलच्या वैभवी चिपकरने प्रथम व सोहम टेमकर याने द्वितीय तर ‘भारतीय संविधान मानव मुक्तीचा जाहिरनामा‘ यावरील निबंध स्पर्धेत गायत्री वरगांवकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
