Headlines

Global Maharashtra Breaking News

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने पटकावले जिल्हास्तरीय विजेतेपद…

⚡आंबोली ता.१५-:सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावले. या शानदार विजयामुळे संघाने विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. जिल्हास्तरीय विजेतेपद मिळवून सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने आपला दबदबा कायम राखला.वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव…

Read Full News

मालवण देवळी समाजतर्फे २६ रोजी विद्यार्थी सत्कार सोहळा

मालवण (प्रतिनिधी) देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग शाखा मालवण आयोजित मालवण तालुक्यातील देवळी समाजातील विद्यार्थी गुणगौरव व सत्कार सोहळा रविवार दि. २६ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण वायरी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे होणार आहे. यावेळी पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण, दहावी, बारावी पंधरावी उत्तीर्ण व इतर स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे….

Read Full News

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशोत्सव व बारावी गुणगौरव संपन्न…

⚡मालवण ता.१५-:मालवण येथील स.का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशोत्सव व बारावी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष विजय केनवडेकर, प्रमुख अतिथी रेकोबा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.संजय खोचरे व हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री. श्रीनाथ फणसेकर, प्राचार्य कैलास राबते, अंबिका कॉम्प्युटरचे श्री. विद्याधर केनवडेकर, लेफ्टनंट प्रा. एम…

Read Full News

विनापरवानगी स्मार्ट मीटर लावल्यास मीटर काढून फेकून देऊ…

बंडू चव्हाण यांचा आक्रमक इशारा :मालवण पं. स. सभेत स्मार्ट मीटरवरून खडाजंगी ⚡मालवण ता.१५-:मालवण पंचायत समितीच्या सभेत स्मार्ट वीज मीटर वरून जोरदार खडाजंगी होऊन सदस्यांनी वीज अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. मालवण तालुक्यात ठिकठिकाणी वीज वितरण कंपनीकडून वीज ग्राहकांची परवानगी न घेता त्यांचे जुने वीज मीटर बदलून नवे स्मार्ट वीज मीटर लावले जात आहेत, या स्मार्ट मीटरमुळे…

Read Full News

पाटबंधारे विभागाची श्वेतपत्रिका काढा; आमदार निलेश राणे यांची मागणी, पालकमंत्र्यांचे तात्काळ आदेश

ओरोस, ता. १५ :जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार निलेश राणे यांनी या विभागाची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. विभागामार्फत कोट्यवधी रुपयांची कामे होत असली तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना दिसत नसल्याचा आरोप करत “कोल्हापूर टाईप बंधारे नेमके काय आणि त्याचा फायदा किती?” असा थेट सवाल त्यांनी…

Read Full News

सिंधुरत्न-२ मधून सिंधुदुर्गच्या विकासाला नवी झेप…

पर्यटन, शेती, मत्स्यव्यवसायातून रोजगारनिर्मितीवर भर:डिसेंबरपूर्वी जिल्हा नियोजन निधीचा शंभर टक्के खर्च; १५ जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे विकसित करणार : पालकमंत्री नितेश राणे.. ⚡ओरोस, ता. १५-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा नियोजन निधी डिसेंबर २०२६ पूर्वीच शंभर टक्के खर्च करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यानंतर जिल्ह्यासाठी अधिक निधी मिळविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाणार…

Read Full News

विठ्ठल मंदिरात १६ ते २३ जुलैदरम्यान विठ्ठल रघुमाई हरिनाम वीणा सप्ताह…

दररोज भजन, कीर्तन, संगीत कार्यक्रम; २५ जुलैला आषाढी एकादशीनिमित्त काकड आरती, महापूजा व महाप्रसाद… ⚡सावंतवाडी, ता. १५-: सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही १६ जुलै ते २३ जुलै २०२६ या कालावधीत विठ्ठल रघुमाई हरिनाम वीणा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या निमित्ताने दररोज सायंकाळी महिला मंडळाचे भजन, वारकरी भजन तसेच विविध भजनी मंडळे आणि…

Read Full News

स्व. विकासभाई सावंत यांच्या प्रथम स्मृतिदिनी काँग्रेसकडून अभिवादन…

⚡सावंतवाडी, ता. १५-: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय विकासभाई सावंत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सावंतवाडी काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेस कार्यालयात त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विकासभाई यांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण करून त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाला उजाळा देण्यात आला.या कार्यक्रमाला सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर यांच्यासह रविंद्र महापसेकर, आनंद परळकर, ज्येष्ठ नेते श्रीकृष्ण तळवडेकर, देवानंद…

Read Full News

कुडाळात न.प. तर्फे डास प्रतिबंध फवारणीचा शुभारंभ

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने शहरात डास प्रतिबंध फवारणीचा शुभारंभ आज (बुधवारी) सांगिर्डेवाडी येथे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आला.पावसाळ्यामध्ये दरवर्षी नगरपंचायतीच्या वतीने डास प्रतिबंध फवारणी केली जाते यावेळी या डास प्रतिबंध फवारणीचा शुभारंभ सांगिर्डेवाडी मधून करण्यात आला घरोघरी जाऊ ही डास प्रतिबंध फवारणी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. या शुभारंभवेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर,…

Read Full News

जनसेवा निधी बांदातर्फे विद्यार्थ्यांचा गौरव

खेमराज बांदाच्या २२ विद्यार्थ्यांचे संस्कृतमध्ये घवघवीत यश! बांदा:जनसेवा निधी बांदा या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शालांत परीक्षेत लक्षणीय यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज रोख परितोषिके देऊन गौरविण्यात आले. गणित, विज्ञान, संस्कृत, मराठी, हिंदी विषयात विशेष प्राविण्य मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.खेमराज बांदाच्या सभागृहात जनसेवा निधी बांदा या संस्थेतर्फे दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच…

Read Full News

You cannot copy content of this page