Global Maharashtra Breaking News

साईप्रसाद काणेकर मित्रमंडळा तर्फेप्रभाग क्रमांक ५ मध्ये मर्यादित गणेश स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.०५-: बांदा शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर मित्रमंडळातर्फे खास गणेशोत्सवनिमित्त प्रभाग क्रमांक ५ मर्यादित घरगुती गणेश सजावट आणि गणेश मूर्ती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा प्रभाग क्रमांक पाच मधील हॉस्पिटल कट्टा, सुतारवाडी, काळसेवाडी, आंबेडकर नगर यांच्यासाठी मर्यादित आहे. गणेश आरास सजावट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख ३ हजार ३३३ रुपये,…

Read More

गणेशभक्तांसह पहिली बस कोकणसाठी रवाना…

⚡सावंतवाडी ता.०५-: सालाबादप्रमाणे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ‌. अर्चना घारे-परब यांच्या सौजन्याने सिंधुदुर्गवासियांसाठी ”अल्प दरात बस सेवा” उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत पहिली बस गणपती बाप्पाच्या जयघोष करीत कोकणात येण्यासाठी मार्गस्थ झालेली आहे‌. सिंधुदुर्ग युवा ग्रुप, पिंपरी चिंचवड यांच्याद्वारे हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पुणे येथून सुटणारी…

Read More

न्हावेलीत इको फ्रेंडली गणेश सजावट, फुगडी स्पर्धा…

⚡बांदा ता.०५-: न्हावेली युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या संकल्पनेतून न्हावेली गाव मर्यादित गणेश चतुर्थी निमित्त इकोफ्रेंडली गणेश सजावट स्पर्धा व महिलांसाठी फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा विनाशुल्क असेल अशी माहिती देण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक अक्षय पार्सेकर पुरस्कृत ११११ रूपये आणि सहभाग प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक युवा सामाजिक कार्यकर्ते रुपेश नाईक पुरस्कृत…

Read More

कबुलायदार गावकर जमीन प्रश्नावरकाहीजण जाणीवपूर्वक मला राजकीय डॅमेज करण्याचा प्रयत्न…

मंत्री दिपक केसरकर:तर गेळे कबुलायदार प्रश्न पूर्णपणे सोडवला जाणार.. ⚡सावंतवाडी ता.०५-:तालुक्यातील कबुलायदार गावकर जमीन प्रश्नावर काहीजण जाणीवपूर्वक मला राजकीय दृष्ट्या डॅमेज करण्याचा प्रयत्न करत आहे बाबत मी वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. तर गेळे कबुलायदार प्रश्न पूर्णपणे सोडवला जाणार आहे त्या ठिकाणी असलेल्या टाऊन…

Read More

जिल्हा परिषदेची भजनी साहित्य योजना प्रभावी…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण:भजनी साहित्य वितरणाचा झाला शुभारंभ.. सिंधुदुर्गनगरी ता ४सिंधुदुर्गातील भजन मंडळे गणेशोत्सव असो वा अन्य धार्मिक कार्यक्रम यात भजनी मंडळे मोठ्या उत्साहाने भजन सादर करून ही कला जोपासत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि या कलेकडे तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी जिल्हा परिषदेची भजनी मंडळांना भजनी साहित्य पुरविणे योजना प्रभावी ठरत आहे. या योजनेला भविष्यात अधिकचा…

Read More

सरकारी योजनेतून उपक्रम करणं सोप्पं, पण स्वतःच्या खिशात हात घालून उपक्रम राबविण शक्य नाही…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण:संदिप गावडे यांच्या मार्फत भजनी मंडळांना प्रोत्साहनपर मोफत साहित्य संच वाटप.. ⚡सावंतवाडी ता.०४-: सरकारी योजनेतून उपक्रम करणं सोप्पं असतं. स्वतःच्या खिशात हात घालून उपक्रम राबविण सहज शक्य नाही. भारतीय जनता पार्टीच्याविचाराला साजेस काम संदीप गावडे यांनी केले. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. हिंदूत्वाची साथ भाजपने कधीही सोडली नाही. बाळासाहेब ठाकरे, अटल…

Read More

ऍड. यशवर्धन जयराज राणे यांना ‘प्रभावशाली भारतीय पुरस्कार २०२४’ प्रदान…

नवीदिल्ली येथे शानदार सोहळ्यात ऍड. राणे यांनी स्वीकारला पुरस्कार.. ⚡कुडाळ ता.०४-: सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या ऍड. यशवर्धन जयराज राणे यांना ‘प्रभावशाली भारतीय पुरस्कार २०२४’ने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार नवी दिल्लीतील रॅडिसन ब्लू, द्वारका येथे झालेल्या भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.हा मानाचा पुरस्कार लेफ्टनंट जनरल आणि एअर फोर्स कमांडर अजय कुमार…

Read More

नाडन येथील २२ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या…

⚡देवगड ता.०४-: देवगड तालुक्यातील नाडण पुजारे वाडी येथील पराग गणेश पुजारे या २२ वर्षीय युवकाने राहत्या घरी स्वयंपाक घरावरील माळ्यावर नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ७:३० च्या सुमारास निदर्शनास आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाडन पुजारेवाडी येथील पराग गणेश पुजारे (22) याची आई आपल्या मुलीला उपचारासाठी घेऊन मुंबईला गेली होती. त्यामुळे…

Read More

बांधकाम कामगारांना शासन आदेशानुसार ९० दिवस प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही व्हावी…

रविंद्र चव्हाण यांचे आदेश:भारतीय मजदूर संघाच्या मागणीनुसार बैठकीचे आयोजन.. ⚡ओरोस ता.०४-: शासन आदेशानुसार ग्रामसेवक हे असंघटित बांधकाम कामगारांना ९० दिवस प्रमाणपत्र देत नसल्याबाबत भारतीय मजदूर संघाने प्रश्न उपस्थित केला असता, याबाबत शासन आदेशाचे पालन करून कार्यवाही होत नसल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री श्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग…

Read More

मालवणमध्ये एसटी संपाला अत्यल्प प्रतिसाद…

⚡मालवण ता.०४-: आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यात एसटी कामगारांनी संप पुकारला असून मालवणमध्ये या संपाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला . या संपात मालवण आगारातील बाळा मालंडकर, संजय सावंत, अमित शंकरदास, सतीश वाळके, अरुण वाघमारे, गुरु घाडी, विनायक गोसावी, हेमंत तळवडेकर, स्वप्नील शिंदे, गुरुनाथ गोळवणकर, समीर माळकर, रोहित बावकर, गोट्या पवार आदी व इतर कर्मचारी सहभागी झाले होते…

Read More
You cannot copy content of this page